गावकऱ्यांनी तब्बल सात तास कोळसा वाहतूक रोखून धरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 05:00 IST2021-09-03T05:00:00+5:302021-09-03T05:00:48+5:30
दिवसेंदिवस कोळशाची ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी ठरत असल्याने परिसरातील गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज वेकोलीतून कोळशाची नियमबाह्य ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. या विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर जुनघरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी गोवरी येथील मुख्य मार्गावर गावकऱ्यांनी वेकोलिची ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखून धरली.

गावकऱ्यांनी तब्बल सात तास कोळसा वाहतूक रोखून धरली
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कोळसा खाणीतील ओव्हरलोड वाहतुकीमुळे गोवरी-पोवनी-साखरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. दिवसेंदिवस कोळशाची ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी ठरत असल्याने परिसरातील गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज वेकोलीतून कोळशाची नियमबाह्य ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. या विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर जुनघरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी गोवरी येथील मुख्य मार्गावर गावकऱ्यांनी वेकोलिची ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखून धरली.
यावेळी ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कावळे, उपसरपंच उमेश मिलमिले, हरिश्चंद्र जुनघरी, ग्रामपंचायत सदस्य चेतन बोभाटे व गावकऱ्यांनी वेकोलि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत वेकोली गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आंदोलन पुन्हा तीव्र करू, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. सकाळी ६ वाजतापासून गोवरी, पोवनी व साखरी येथील नागरिकांनी सात तास वाहतूक रोखून धरली होती.
नागरिकांनी केले मुंडण
ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी गोवरी-पोवनी मुख्य मार्गावर चक्काजाम केले. वेकोलि प्रशासनाच्या निषेधार्थ नागरिकांनी मुंडन करून जाहीर निषेध नोंदविला.