गावस्तरावरील विलगीकरण केंद्र रुग्णांना आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST2021-05-05T04:47:18+5:302021-05-05T04:47:18+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ...

गावस्तरावरील विलगीकरण केंद्र रुग्णांना आधार
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या नागरिकांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. चंद्रपूर येथे बेड मिळत नसल्यामुळे नातेवाइकांना मानसिक तसेच आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावस्तरावर विलगीकरण केंद्र उभारल्यामुळे प्राथमिक उपचार रुग्णांना मिळणार आहेत. यातून रुग्णांना काही प्रमाणात का होईना आधार मिळेल, असे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.
वरोरा, भद्रावती तालुक्यांतील विलगीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
वरोरा तालुका अंतर्गत माढेळी, नागरी, टेमुडा, शेगाव व भद्रावती तालुका अंतर्गत चंदनखेडा, मुधोली, घोडपेठ, नंदोरी बु., माजरी येथे कोरोना रुग्णांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी कोविड विलगीकरण केंद्राचे आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार वानखेडे बेडसे, संवर्ग विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी मुंजनकर, मंडळ अधिकारी, पंचायत विभाग व आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. भद्रावती येथील कोरोना विलगीकरण केंद्राच्या उद्घाटनावेळी उपविभागीय अधिकारी शिंदे, तहसीलदार शितोडे, संवर्ग विकास अधिकारी आरेवार, तालुका आरोग्य अधिकारी आसुटकर, मंडळ अधिकारी तसेच पंचायत विभाग व आरोग्य विभाग कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.