गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्राम सदस्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:58+5:302021-04-23T04:29:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसापूर : देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सगळीकडे हाहाकार माजला आहे. आता त्याची झळ खेड्यांपर्यंत येऊन ...

गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्राम सदस्याची धडपड
लोकमत न्यूज नेटवर्क
विसापूर : देशात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सगळीकडे हाहाकार माजला आहे. आता त्याची झळ खेड्यांपर्यंत येऊन पोहोचली आहे.
कोरोनापासून ग्रामस्थांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी फ्रन्टलाईन वर्कर, आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु, प्रत्येक ठिकाणी त्यांना पोहोचणे शक्य नसल्याने आपलेही काही कर्तव्य आहे, याचे भान ठेवून विसापूर येथील ग्रामपंचायत सदस्य सुरज टोमटे यांनी विदर्भ-कोकण ग्रामीण बँक, पोलीस चौकी, ग्रामपंचायत कार्यालय व गावातील वर्दळीचे ठिकाण हे सर्व स्वतः न्यू शारदा मंडळाच्या सहकाऱ्यांसह सॅनिटाईझ केले.
त्यांच्या या कामामुळे गावात त्यांचे कौतुक होत आहे. ग्रामपंचायत सदस्य कर्तव्यदक्ष व सामान्य माणसाची काळजी घेणारा असावा, या त्यांच्या कामापासून इतरांनीही प्रेरणा घेऊन गाव स्वच्छ केल्यास गाव कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.