शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

कधी नकोसे असलेले गाव झाले सोन्यासारखे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 12:42 PM

Chandrapur News सोनापूर गाव दिसले की हमखास नाकावर रूमाल यायचे. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तोबा घाण; मात्र योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने आज गाव सोन्यासारखे झाले आहे.

ठळक मुद्देसोनापूर ठरले जिल्ह्यातील पहिले सुंदर गाव

नीलेश झाडे

 लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सोनापूर गाव दिसले की हमखास नाकावर रूमाल यायचे. गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तोबा घाण; मात्र योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि गावकऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नाने आज गाव सोन्यासारखे झाले आहे. आर.आर.आबा पाटील सुंदर गाव योजनेत गावाने जिल्ह्यातून प्रथम स्थान मिळविले आहे.

गोंडपिपरी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सोनापूर गाव समस्यांचे माहेरघर होते. अशात ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी गावाचे रूप बदलविण्याचे ठरविले. सरपंच जया सातपुते यांच्या पुढाकारातून गावात अनेक योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या. ग्रामपंचायतीने गाव स्वच्छता मोहीम हाती घेतली. सोबतच शोषखड्डे, शौचालय बांधकाम, हातपंप खोदकाम, भाजीपाला लागवड, गावातील मुख्य भिंतींवर भिंतीचित्रे, कचऱ्याचे योग्य नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, आंतरजातीय विवाह सोहळा, मादक पदार्थाच्या विक्रीवर आळा घालणे, प्लॅस्टिक बंदी, ग्रामपंचायत पेपरलेस करणे, वृक्ष लागवड, सिंचनाच्या सोयी, नळ जोडणी, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, करमणूक केंद्र अशी अनेक विकासात्मक कामे केल्या गेली. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीला अखेर फळ मिळाले. आर.आर.आबा पाटील सुंदर गाव योजनेत सोनापूरने पहिला क्रमांक पटकाविला आहे.

गावाचा सर्वांगीण विकास करणे त्याचबरोबर गावाची ओळख निर्माण करणे हाच आमचा उद्देश आहे. गावकऱ्यांच्या भरीव सहकार्याने सर्वकाही साध्य झाले आहे.

-जयाताई सातपुते, सरपंच, सोनापूर.

टॅग्स :Socialसामाजिक