गाव तसं चांगलं, पण वेशीवर टांगलं
By Admin | Updated: August 3, 2015 00:46 IST2015-08-03T00:46:52+5:302015-08-03T00:46:52+5:30
गावाचा विकास व गावाचे भविष्य घडवण्याची ताकत गावातील नागरिकांमध्ये असते. परंतु पार्टी आणि पक्षाच्या नावाखाली ...

गाव तसं चांगलं, पण वेशीवर टांगलं
मेंडकी गावाची व्यथा : लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
मेंडकी : गावाचा विकास व गावाचे भविष्य घडवण्याची ताकत गावातील नागरिकांमध्ये असते. परंतु पार्टी आणि पक्षाच्या नावाखाली गावातील काही स्वत:ला लिडर म्हणवून घेणारे काही समाजकंटक कार्यकर्ते गावात आपसातच भांडण, तंटे लावत असल्याने विकास कामे रखडली आहेत. या समाजकंटक कार्यकत्यांमुळे आज मेंडकी गावाची प्रतिमा मलीन झाली असून ‘गाव तस चांगलं, पण वेशीवर टांगलं’ अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांतून उमटत आहेत.
मागील पाच वर्षापूर्वी मेंडकी गावाची मिरविलेली नावलौकिकता आज संपल्यात जमा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे येथील ग्रामपंचायतीचा गलीच्छ राजकारण. या राजकारणामुळे मेंडकी गावाचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. विकासाच्या नावाने स्वत:चाच विकास साधणारे येथील काही वक्ते गावात भांडण, तंटे करून स्वार्थी राजकारण करीत असतात. यात मात्र मेंडकी हे गावातील सामान्य नागरिक भरडल्या जात आहे. हे कार्यकर्ते समाज-समाजात गटबाजीचे राजकारण करीत असतात.
पाच वर्ष सत्ता भोगायची आणि ग्रामपंचायतच्या मासीक सभेत भांडण, हाणामारी, शिवीगाळ, कार्यक्रमात पक्षीय राजकारण, गाव तोडण्याचा उपक्रम मेंडकी गावात नेहमीच पाहायला मिळते. पण यामुळे आपल्या गावाची आब्रु वेशीवर टांगल्या जाईल याकडे मात्र याकडे कुणाचेही लक्ष नाही.
अशा दृष्ट समाजकंटक कार्यकर्त्याकडून मेंडकीचा विकास खुंटत चाललेला आहे. यामुळे मेंडकी हे ‘गाव तस चांगलं, पण वेशीवर टांगलं असे म्हणण्यास वावगं ठरणार नाही. आगामी निवडणुकीनंतर कशी परिस्थिती येणार याविषयी नागरिकांत चर्चा सुरू आहे. (वार्ताहर)