ग्रामस्वच्छता हा ग्रामविकासाचा केंद्रबिंदू

By Admin | Updated: March 7, 2016 00:44 IST2016-03-07T00:44:19+5:302016-03-07T00:44:19+5:30

गावाच्या विकासात स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाने स्वच्छतेची जबाबदारी घेऊन त्यांनी सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी.

Village Cleanliness is the centerpiece of rural development | ग्रामस्वच्छता हा ग्रामविकासाचा केंद्रबिंदू

ग्रामस्वच्छता हा ग्रामविकासाचा केंद्रबिंदू

चंदूपाटील मारकवार : अंबुजा सिमेंटतर्फे स्वच्छता मेळावा
गडचांदूर : गावाच्या विकासात स्वच्छता हा महत्त्वाचा घटक आहे. प्रत्येकाने स्वच्छतेची जबाबदारी घेऊन त्यांनी सुरुवात स्वत:च्या घरापासून करावी. तेव्हा संपूर्ण गाव स्वच्छ होईल ते सर्व बाजूनी समृद्ध होईल म्हणून स्वच्छता हा समृद्ध ग्रामविकासाचा केंद्रबिंदू आहे, असे प्रतिपादन आदर्श गाव राजगडचे उपसरपंच चंदू मारकवार यांनी अंबुजा सिमेंट फाऊंडेशन, उपरवाहीच्या वतीने आयोजित स्वच्छता मेळावा कार्यक्रमात केले.
अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उपरवाहीच्या वतीने स्थानिक कार्यालयाच्या सभामंडपात स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक राजगडचे उपसरपंच चंदू मारकवार यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे कार्यक्रम समन्वयक सोपान नागरगोजे होते. प्रमुख पाहुणे म्हणून निप्पो आरओ प्लँटचे अध्यक्ष अनिल पोहोणे, प्रा. डॉ. शरद बेलोरकर, कोरपना पंचायत समितीचे अधिकारी लाटेलवार, खोब्रागडे आदी उपस्थित होते.
स्वच्छता मेळावा कार्यक्रमानिमित्त परिसरातील आदर्श व निर्मल ग्राम होण्यासाठी प्रयत्नशिल असणाऱ्या पिंपळगाव, कुकडसाथ, आसन बुज. आसन खुर्द, वरझडी, कुसळ, हरदोना बुज. लखमापूर या गावांचा त्यांच्या कार्यासाठी सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक कार्यक्रम समन्वयक जितेंद्र बैक यांनी केले. संचालन सरोज अंबागडे यांनी तर आभार कल्पना भेंडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता अंबुजा सिमेंट फाऊंडशनचे सुजीत नगराळे, गोपाल कोटनाके, नीलम हरिनखेडे, लिना तेलंग यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला परिसरातील गावकरी बहुसंख्येने हजर होते. (वार्ताहर)

Web Title: Village Cleanliness is the centerpiece of rural development