शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

चंद्रपूर जिल्ह्यातले एकारा हे गाव कायमचे जगापासून तुटलेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 11:10 AM

विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. अमेरिकेत काय घडले, हे एका मिनिटात भारताच्या टोकावर असलेल्या कन्याकुमारीत समजते. पण ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा गाव मात्र आजही संपर्क कक्षेच्या बाहेर आहे.

ठळक मुद्दे६ वाजताच सर्वत्र शांतता

घनश्याम नवघडे।आॅनलाईन लोकमतनागभीड : विज्ञानाने फार मोठी प्रगती केली आहे. अमेरिकेत काय घडले, हे एका मिनिटात भारताच्या टोकावर असलेल्या कन्याकुमारीत समजते. पण ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा गाव मात्र आजही संपर्क कक्षेच्या बाहेर आहे.ब्रम्हपुरी तालुक्याच्या शेवटच्या टोकाला हे गाव असून घनदाट जंगलात वसले आहे. गावाची लोकसंख्या दीड हजारांच्या आसपास आहे. परिसरातील गावांचे हे गाव मुख्यालय आहे. ये-जा करायला पक्के डांबरी रस्ते असले तरी संपर्काच्या दृष्टीने भ्रमणध्वनीची कोणतीही सेवा या ठिकाणी काम करीत नाही. आज सर्वच मोबाईल कंपन्यांनी आपल्या सेवेच्या नेटवर्कचे जाळे सर्वत्र विनले आहे. मात्र या परिसरात सेवा देण्यास या कंपन्याही अपयशी ठरल्या आहेत. या गावातून इतर गावांसोबत मोबाईलद्वारे संपर्क करतो म्हटले तर घरावर चढावे लागते. एवढे करुनही संपर्क होईलच, याची शाश्वती नाही. येथील लोकांनी महागडे मोबाईल खरेदी केले आहेत. पण ते कुचकामी ठरले आहेत. या ठिकाणी एक शासनमान्य आश्रमशाळा आहे. साडेतीनशे ते चारशे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. वन विभागाचे कार्यालय येथे असून विश्रामगृहही आहे. जिल्हा परिषदेची केंद्रीय शाळा या ठिकाणी कार्यरत आहे. एवढेच नाही तर परिसरात १० ते १२ गावांचा समावेशही आहे. एवढया जमेच्या बाजू असताना मोबाईल कंपन्यांनी आपले नेटवर्क उभारू नये, हे आश्चर्यच आहे.

६ वाजताच सर्वत्र शांततासंपूर्ण परिसर घनदाट जंगलाने व्याप्त आहे. त्यामुळे वाघ, बिबट व अन्य जंगली श्वापदांचा वावर याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. परिणामी लोक नेहमीच या प्राण्यांच्या दहशतीखाली वावरत असतात. संध्याकाळी ६ वाजताच या गावात सर्वत्र शांतता पसरली असते.

तर रेल्वे मार्ग होईल जवळ

हे गाव नागभीड तालुक्यातील बाळापूरला अगदी जवळ आहे. कागदोपत्री नोंद असलेल्या आणि जंगलातून गेलेल्या कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर केले तर हे अंतर केवळ १० कि.मी. होईल, अशी माहिती तेथील एक कर्मचारी गणेश कडस्कर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. यामुळे हे गावच नाही तर परिसरातील काही गावेसुद्धा बाळापूर जाणाऱ्या रेल्वेशी जुळतील व जिल्ह्याच्या अगदी जवळ येतील.

टॅग्स :agricultureशेती