शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

वडेट्टीवार यांनी माहिती दडवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:08 AM

वडेट्टीवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात शिवानी इंफ्राटेक या कंपनीकडून १ लाख ५० हजार रुपये स्वत:च्या आणि ३ कोटी ९४ लाख त्यांच्या पत्नीच्या नावावर कर्ज दाखविले आहे.

चंद्रपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ज्या कंपन्यांच्या नावावर कर्ज घेतल्याचा उल्लेख केलेला आहे. त्या कंपन्या बंद असल्याची तक्रार येथील दीपक मोहता यांनी पोलीस व आयकर विभागाकडे केली आहे.

वडेट्टीवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात शिवानी इंफ्राटेक या कंपनीकडून १ लाख ५० हजार रुपये स्वत:च्या आणि ३ कोटी ९४ लाख त्यांच्या पत्नीच्या नावावर कर्ज दाखविले आहे. ही कंपनी जुलै २०१८ लाच बंद झालेली दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे बंद झाल्यावर त्या कंपनीत कुणाचेही घेणे देणे नसते. दुसरी एक पार्टनरशिप फर्म देवयानी लॉजिस्टिक याचाही वडेट्टीवार यांनी उल्लेख प्रतिज्ञापत्रात केलेला नाही.

प्रधान हॉस्पिटल नावाच्या कंपनीत त्यांनी एक १ कोटी ८४ लाख ८५ हजार गुंतवलेले आहे. तर पत्नीच्या नावाने ६८ लाख गुंतवलेले असून त्याचाही प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही, अशी तक्रार दीपक मोहता यांनी केली आहे. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता अशी कुठल्याही प्रकारची तक्रार आपणाकडे आली नसल्याचे स्पष्ट केले.

ब्लॅकमेलींगचा प्रकार

निवडणुकीच्या काळापासून ४५ दिवसाच्या आत कुठेही तक्रार करून चौकशीची मागणी करता येते. मूळात त्यांनी इलेक्शन पीटीशन करायला पाहिजे. त्याचे उत्तर आम्ही देऊ. परंतु तक्रारीची कॉपी आगाऊ आठ दिवसांपूर्वी माझ्याकडे पाठवितो आहे. याचाच अर्थ दीपक मोहताचा उद्देश काय आहे हे स्पष्ट होते. त्यांच्या तक्रारीत काही तथ्य नाही. या मोहताचा बोलविता धनी कोण आहे, तो कुठे राहतो. ही सगळी माहिती माझ्याकडे आहे.- विजय वडेट्टीवार,मदत व पुनर्वसन मंत्री

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार