स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिल्लीत विदर्भवादी देणार धरणे

By Admin | Updated: March 4, 2016 00:56 IST2016-03-04T00:56:16+5:302016-03-04T00:56:16+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिल्लीमध्ये ३१ मार्चला धरणे देण्याचे ठरविले आहे.

Vidarbhavwadi will keep it in Vidarbha state for independents in Delhi | स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिल्लीत विदर्भवादी देणार धरणे

स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिल्लीत विदर्भवादी देणार धरणे

३१ मार्चला आंदोलन : भेटीसाठी पंतप्रधानांना मागितली वेळ
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने दिल्लीमध्ये ३१ मार्चला धरणे देण्याचे ठरविले आहे. या आंदोलनादरम्यान पंतप्रधानांकडे विदर्भाची मागणीसंदर्भातील चर्चेसाठी वेळ मागण्यात आला आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेत अ‍ॅड. वामनराव चटप यानी गुरूवारी चंद्रपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या आंदोलनासंदर्भात माहिती देताना अ‍ॅड. चटप म्हणाले, दिल्लीतील जंतर-मंतरवर ३१ मार्चला सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणे देण्याचा कार्याक्रम आखण्यात आला आहे. या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना निमंत्रण दिले आहे. या सोबतच लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए. संगमा, गृहमंत्री राजेंद्रसिंग, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनाही विदर्भ राज्याच्या मागणीचे निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळाच्या भेटीची वेळ मागीतली आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पदाधिकारी २८ मार्चपासून दिल्लीत थांबून महत्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. या धरणे आंदोलनानिमीत्त जनजागृतीसाठी विदर्भात जिल्हा बैठका सुरु झाल्या आहेत. अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी बैठका झाल्या असून चंद्रपुरात ३ मार्चला बैठक पार पडली. ५ मार्चला गोंदीया आणि ६ मार्चला भंडारा येथे बैठक होत आहे. १० ते २५ मार्चपर्यंत विदर्भभर मोठ्या जाहीर सभा आणि तालुका बैठका असा कार्यक्रम आखण्यात आल्याची माजिहती यावेळी देण्यात आली. सत्तेत आल्यावर स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यचा शब्द भाजपाने दिला होता. मात्र सत्तेत येऊन दीड वर्ष लोटूनही यावर मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत. विदर्भवाद्यांनी त्यांच्या घरी जावून जाब विचारण्यचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी बळजबरीने कार्यकर्त्यांना अटक केली. त्यामुळे दिल्लीत जावून धरणे देण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगण्यात आले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Vidarbhavwadi will keep it in Vidarbha state for independents in Delhi