भाजपच्या विजयाचा जल्लोष

By Admin | Updated: March 12, 2017 01:23 IST2017-03-12T01:23:52+5:302017-03-12T01:23:52+5:30

उत्तर प्रदेश, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल चंद्रपूर

The victory of the BJP's victory | भाजपच्या विजयाचा जल्लोष

भाजपच्या विजयाचा जल्लोष

मिरवणूक : उत्तर प्रदेश, उत्तराखंडात बहुमत
चंद्रपूर : उत्तर प्रदेश, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल चंद्रपूर महानगर शाखेच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांनी शनिवारी गुलाल उधळत ढोल ताशाच्या निनादात विजयी जल्लोष केला. यावेळी मिरवणूक काढण्यात आली.
उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये निर्विवाद बहुमताची आकडेवारी प्राप्त होताच शनिवारी भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी स्थानिक गिरनार चौकातून गांधी चौकापर्यंत विजयी मिरवणूक काढली. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयाच्या घोषणा दिल्या. याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, भाजपाचे जिल्हा महामंत्री राजेश मून, भाजप नेते सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक तुषार सोम, मोहन चौधरी, राजू घरोटे, नगरसेविका अंजली घोटेकर, स्वरूपा असरानी, प्रमोद शास्त्रकार, विनोद शेरकी, संदीप आगलावे, रमेश भूते, राजू येले, आशा आबोजवार, गुडधे, सज्जाद अली, शीतल इटनकर, नीलेश बेडकर, प्रा. रवी जोगी, शेख जुम्मन रिझवी, तेजासिंह, सचिन निंबाळकर, राजू अवघडे, स्वप्निल बनकर, शेख अजहर, जितू शर्मा, धनंजय मुफकलवार, अक्षय खांडेकर, अजय अडपेवार, रोहित पाठक, विपीन मेंढे, राजेश वाकोडे, सुशांत शर्मा, जहिर खान कादरी आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: The victory of the BJP's victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.