विद्यार्थी ठरताहेत प्रलोभनाचे बळी

By Admin | Updated: September 8, 2015 00:48 IST2015-09-08T00:48:29+5:302015-09-08T00:48:29+5:30

पुढील शैक्षणिक वर्षाआधीच म्हणजे सप्टेंबर महिन्यातच खासगी कोचिंग क्लासेसचे वेगवेगळे आॅफर्स विद्यार्थ्यांना मिळणे सुरू होतात.

The victim of temptation is the student | विद्यार्थी ठरताहेत प्रलोभनाचे बळी

विद्यार्थी ठरताहेत प्रलोभनाचे बळी

शिकवणीच्या नावावर लूट : तक्रार करायची तर कुणाकडे?
बाळ निंबाळकर कुचना
पुढील शैक्षणिक वर्षाआधीच म्हणजे सप्टेंबर महिन्यातच खासगी कोचिंग क्लासेसचे वेगवेगळे आॅफर्स विद्यार्थ्यांना मिळणे सुरू होतात. या आॅफर्सचे अनेक किस्से मनोरंजनात्मक आहेत. या आॅफर्स विद्यार्थी व पालकांना भुरळ घालत असून अनेकांची यात लूट झाल्याचे प्रकारही घडले आहेत.
नागपुरातील एक शिक्षण संस्था असून आय.आय.टी.साठीचे इंजीनिअर व एआयआय-एमएसचे डॉक्टर्स घडविण्याचे व्रत घेऊन सुरु आहे. त्यांच्यानुसार सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या कोचींग क्लाससाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. परीक्षेचा निकाल लागला की, पावणेतीन लाख रूपये शुल्क असलेल्या या संस्थेत मुलांच्या प्रवेश परीक्षेनंतर मिळालेल्या गुणांच्या आधारे ही रक्कम कमी करण्याचा दावा केला ककरण्यात येते. प्रवेश परीक्षेत किमान तीस टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला एकूण शुल्काच्या ३० टक्के सूट अशी टक्केवारीनुसार सूट मिळत असताना ज्यांना १०० टक्के गुण मिळतील, त्यांना दोन वर्ष ११ वी व १२ वीची शिकवणी मोफत, फक्त वसतिगृहाचे व नागपूरातील खाजगी विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क भरावे लागेल असे या संस्थेचे प्रलोभन आहे.
या आॅफर्सचे सत्य मात्र ते सांगायला तयार नाहीत. पुढे मात्र ‘दिल की बात बता देता है असली नकली चेहरा’ याप्रमाणे आमचे शुल्क सर्वाधिक असल्याने ही आॅफर आम्हाला देता येते, असे अप्रत्यक्षात सांगून दिले जाते.
तर दुसरी आॅफर एका दुसऱ्या कोचींग क्लासची असून हे सुद्धा इंजीनिअर आणि मेडिकलचे विद्यार्थी वर्ग ११ आणि १२ वी मध्ये घडवतात, असे भासविले जाते. आमचे वर्धेच्या सेवाग्राम मेडीकल कॉलेजमध्ये ११ विद्यार्थी यावर्षी एमबीबीएससाठी निवडल्या गेल्याचे असे अनेक उदाहरणे देऊन अखिल भारतीय स्तरावरच्या परीक्षेतून ही निवड झाल्याचे ते सांगतात. त्यांची आॅफर सप्टेंबर महिन्यापासून सुरू होते. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास दरवर्षी होणारी एकूण शुल्काची १० टक्के वाढ रक्कम ही सप्टेंबरमध्ये प्रवेश निश्चित केल्यास घेतली जाणार नसल्याचे सांगितले जाते. यात सद्याची त्यांची शुल्क १ लाख ९० हजार तसेच वसतिगृह-जेवण व महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क वेगळे आहे. या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दहा टक्के आॅफरबद्दल विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ केली. प्रलोभन देऊन लुटण्याचे प्रकार परीसरात सुरू आहे.

Web Title: The victim of temptation is the student