Very few reservoirs in most of the embankments | बहुतांश बंधाऱ्यात अत्यल्प जलसाठा
बहुतांश बंधाऱ्यात अत्यल्प जलसाठा

ठळक मुद्देकाही बंधारे आतापासूनच कोरडे : उन्हाळ्यात उद्भवणार टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : यंदा परतीच्या वेळी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेवटी-शेवटी पाणी जलसाठ्यांमध्ये साठले नाही. पाणी अडवा, पाणी जिरवा योजनेंतर्गत कोट्यवधींचा खर्च करून शासनाने बंधारे बांधले. राजुरा तालुक्यातील अनेक बंधाऱ्यांमध्ये आतापासूनच अत्यल्प जलसाठा आहे. काही बंधारे तर आता जानेवारी महिन्यातच कोरडे पडले आहेत. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात राजुरा तालुक्यात पाणीटंचाईचा भडका उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पाण्याच्या पातळीत वाढ होण्याच्या दृष्टीने शासनाने जलयुक्त शिवारसारखी सिंचनाच्या दृष्टीने शेतकºयांचे भले करणारी योजना अंमलात आणली. यापूर्वीही शासनाने शिवारात लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधले. त्यात काही बंधारे निधीअभावी रखडले आहे. तर काही बंधारे अर्धवट असून यात शासनाचा लाखो रूपयांचा चुराडा झाला आहे. या बंधाºयात पाण्याचा एक थेंबदेखील अडविता आला नाही, हे दुर्दैव आहे. यंदा हिवाळ्यातच बंधाºयात अत्यल्प जलसाठा आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, चार्ली, निर्ली, चिंचोली, साखरी, वरोडा, पेल्लोरा, धिडशी, मारडा, मानोली, बाबापूर, हिरापूर परिसरातील पाण्याची पातळी खाली गेल्याने गावकºयांची चिंता वाढली आहे. राजुरा तालुक्यात शेकडो बंधारे शासनाने बांधले आहेत. मात्र आजघडीला या बंधाºयात पाण्याचा अत्यल्प साठा उरला नाही. काही बंधारे निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाहून गेले आहे. कर्तव्यात कसूर करणाºया कंत्राटदारांवर व संबंधित अधिकाºयांवर कारवाई होणे गरजेचे असतानाही त्याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.

Web Title: Very few reservoirs in most of the embankments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.