धम्म समारंभ कार्यक्रमाचे वाहन व डेकोरेशनचे साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:47+5:302021-02-05T07:42:47+5:30
मागील २५ वर्षांपासून ३० व ३१ जानेवारीला तपोभूमी संघारामगिरी येथे धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. धम्मक्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील ...

धम्म समारंभ कार्यक्रमाचे वाहन व डेकोरेशनचे साहित्य जप्त
मागील २५ वर्षांपासून ३० व ३१ जानेवारीला तपोभूमी संघारामगिरी येथे धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. धम्मक्रांतीचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो धम्म बांधव येतात. कार्यक्रमाची सांगता झाल्यावर १ डिसेंबर रोजी साहित्य व पाण्याचे टँकर संघरामगिरीवरून खडसंगीला परत नेत असताना वनविभागाने सकाळी ११ वाजता वाहन रोखून धरले. यावेळी सर्वाचे मोबाईल जप्त केले. तीन दिवस उलटूनही साहित्य परत दिले नाही. यामुळे समाजबांधवांमध्ये वनविभागाविरुद्ध रोष व्यक्त होत आहे. याबाबत वनविभाग (बफर)चे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, भ्रमणध्वनी उचलला नाही. तर एसएफ यांनी चंद्रपूर येथील कार्यालयात या असे सांगून वेळ मारून नेली.
बॉक्स
कोऱ्या कागदावर घेतल्या सह्या
वनविभागाने वाहनांची अडवणूक केली. वाहनावरील मजूर याबाबत गावकऱ्यांना माहिती देतील, यामुळे वनविभाग (बफर) यांनी वाहन पकडलेल्या वाहनधारक व वाहनावर असणाऱ्या मुलांच्या कोऱ्या कागदावर दमदाटी करून सह्या घेऊन ठेवल्याची माहिती आहे.