ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महेशनगरात विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:15+5:302021-02-05T07:42:15+5:30
चंद्रपूर : महेशनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुलाबराव लोणकर ...

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे महेशनगरात विविध उपक्रम
चंद्रपूर : महेशनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गुलाबराव लोणकर होते. प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेविका माया उईके, शीला चव्हाण, तसेच विश्वनाथन तामगाडगे, मंजुषा कासनगोट्टूवार, पुरुषोत्तम सहारे, बाबाराव पडवे, गंगाधर पिदुरकर, डॉ. ललीत तामगाडगे, संध्या सहस्त्रबुद्धे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी कासनगोट्टूवार दाम्पत्य आणि नगरसेविका माया उईके, शीला चव्हाण तसेच वृक्षप्रेमी सुरेश तराळे, कवी प्रदीप देशमुख यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निःशुल्क रोगदान शिबिर, उपरे ॲग्रो इंटरप्राईजेसतर्फे कृषी प्रदर्शन,लोणकर यांचे पर्यावरणपूरक सायकल प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण आदी कार्यक्रमासह ज्येष्ठ नागरिक संघाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना नगरसेवक कासनगोट्टूवार म्हणाले, महेशनगर येथील ज्येष्ठ नागरिकांनी खऱ्या अर्थाने स्वच्छतेचा मंत्र जपलेला आहे. ज्येष्ठांचे स्वच्छतेचे कार्य वाखाणण्याजोगे आहे. आपले कार्य आणि आशीर्वादामुळेच मला नवी प्रेरणा व सत्कार्य करण्याचे बळ मिळत असल्याचे सांगून मैदानाच्या विकासासाठी ज्येष्ठांच्या मागणीनुसार तीन लाख रुपये मदत नगरसेवक फंडामधून देण्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे सल्लागार विश्वनाथ तामगाडगे, संचालन शिवानी देवतळे, आभार गंगाधर पिदुरकर यांनी मानले. आयोजनाकरिता तुळशीराम नरड, वामन मंदे, दयाराम उराडे, शंकरराव गेडेकर, वृषाली बुरिले, डांगे, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य जे. डी. पोटे, प्रभाकर देठेकर, मंदार सहस्त्रबुद्धे,रवी नरड आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
.