एक महिन्यात वेकोलित पदभरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST2021-01-10T04:20:50+5:302021-01-10T04:20:50+5:30
चंद्रपूर : वेकोलित पदभरती करण्यात यावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वेकोलिच्या नागपूर सी.एम.डी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला ...

एक महिन्यात वेकोलित पदभरती
चंद्रपूर : वेकोलित पदभरती करण्यात यावी, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात वेकोलिच्या नागपूर सी.एम.डी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाची दखल घेत एका महिन्यात वेकोलि अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातील रिक्त जागांची पदभरती करण्याचे आश्वासन वेकोलिच्या नागपूर सी.एम.डी कार्यालयाच्या वतीने देण्यात आले आहे. आ. किशोर जोरगेवार यांच्यासह सी.एम.डी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत आश्वासन देण्यात आले. यावेळी नागपूर विभागाचे सी.एम.डी मनोज कुमार यांची उपस्थिती होती.
चंद्रपुरात वेकोलिचे जाळे आहे. याचा मोठा दुष्परिणाम प्रदूषण रुपाने चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे. मात्र स्थानिकांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे वेकोलित रिक्त असलेली पदे भरण्यात यावी, या मागणीकरिता ५ जानेवारीला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन नागपूर विभागाचे सी.एम.डी यांना देण्यात आले. यावर चर्चा करण्यासाठी सी.एम.डी कार्यालयात बैठक घेण्यात आली. आमदार किशोर जोरगेवार यांनी मोर्चा दरम्यान केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहे. एका महिन्याच्या आत वेकोलितर्फे विविध विभागात रिक्त जागांची पदभरती करण्याचे आश्वासन बैठकीत सी. एम. डी मनोज कुमार यांनी आ. जोरगेवार यांना दिले आहे.