शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि बल्लारपूर क्षेत्राला कोट्यवधीचा फटका

By admin | Updated: February 8, 2015 23:32 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या खाणीमध्ये अंधाधुंद कारभार सुरू आहे. वेकोलि बल्लारपूर क्षेत्रामधील नवीन खाणी सुरू करताना योग्य काळजी न घेतल्याने जवळपास

बी.यू. बोर्डेवार - राजुरावेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सुरू असलेल्या खाणीमध्ये अंधाधुंद कारभार सुरू आहे. वेकोलि बल्लारपूर क्षेत्रामधील नवीन खाणी सुरू करताना योग्य काळजी न घेतल्याने जवळपास १०० कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. कोळशाच्या पाहणीसाठी सरकारतर्फे सर्व्हे करण्यात येतो. सदर सर्व्हे करताना योग्य दिशानिर्देशाचे पालन करून खाणीची निर्मिती करणे आवश्यक आहे. मात्र असे झाले नसल्याने अनेक खाणी बंद पडल्या आहे.विरूर-सुबई परिसरातील खाणीवर जवळपास ७० कोटी रुपये खर्च करण्यात आले. येथील शेतकऱ्याच्या शेतजमिनी हस्तांतरीत करण्यात आल्या. प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली परंतु खाण सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नसल्याने बंद करण्यात आली. येथे बांधकाम करताना योग्य काळजी घेण्यात आली नसल्याचा सूर आता कर्मचाऱ्यांत आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या थातुरमातुर कार्यप्रणालीमुळे या भागातील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. या ठिकाणी क्वार्टर तयार करण्यात आले. मात्र त्यातील काही क्वार्टर तोडण्यात आले आहे. या खाणी बंद पडण्यासाठी जबाबदार असलेल्या वेकोलि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. गोवरी-२ या खाणीच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत गोवरी-२ ही खाणसुद्धा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ३०० च्या वर कर्मचारी या खाणीत इतरत्र हलविण्यात आले. खाण सुरु केल्यानंतर काही वर्ष चालविल्यानंतर त्या लवकरच बंद करण्यात येतात. त्यामुळे शासनाला मोठा फटका बसत आहे. आता पवनी खुल्या खाणीचे काम सुरू आहे. या ठिकाणीसुद्धा पाहिजे त्या प्रमाणात कोल बेंच नसल्याचे बोलल्या जात आहे. बल्लारपूर क्षेत्रामध्ये कोलबेल्ट असला तरी भूगर्भ सर्व्हे योग्य न झाल्यामुळे वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राला कोट्यवधीचा फटका बसत आहे. यापूर्वी बल्लारपूर क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर अनेकवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. परंतु चौकशीला येणारे अधिकारी हे वेकोलिचेच असल्यामुळे कुठलीच कार्यवाही होताना दिसत नाही. कोळसा खाणीमध्ये कोळसा, यंत्र चोरीवर आळा घालणे गरजेचे असून संपुर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.