उसगाव-मुंगोली रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:26 AM2020-12-24T04:26:31+5:302020-12-24T04:26:31+5:30

घुग्घुस : येथून जवळच असलेल्या वर्धा नदी मुंगोली पुलाजवळ तसेच उसगाव ते मुंगोली दरम्यान, रस्त्यावर मोठे खड्डे पडले ...

Usgaon-Mungoli road | उसगाव-मुंगोली रस्त्यावर

उसगाव-मुंगोली रस्त्यावर

Next

घुग्घुस : येथून जवळच असलेल्या वर्धा नदी मुंगोली पुलाजवळ तसेच उसगाव ते मुंगोली दरम्यान, रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. सतत वर्दळ असलेल्या या रस्त्यावर देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.

उत्पादनात घट शेतकºयांमध्ये निराशा

चंद्रपूर : तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांना यावर्षी आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. परतीचा पाऊस व विविध किडरोगांनी धानाच्या उत्पादनात कमालीची घट झाली. लागवडीचा खर्चही निघेल की नाही, या प्रश्नाने शेतकरी धास्तावला आहे. अस्मानी व सुलतानी संकटात अडकलेल्या

धान उत्पादक शेतकऱ्याला मदतीची गरज आहे.

ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत

चंद्रपूर: ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे.अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने अवैध वाहतुकीवर आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली.

कडाक्याच्या थंडीने तालुक्यात हुडहुडी

चंद्रपूर : मागील दोन ते तीन दविसांपासून तापमानाचा पारा घसरल्याने कडाक्याची थंडी सुरू झाली. मागील आठवड्यापासून वातावरणात सतत गारवा कायम असून सकाळी मोठ्या प्रमाणात धुकी दिसून येत आहे.

Web Title: Usgaon-Mungoli road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.