मूल येथील बागेचा अवैध कामासाठी वापर

By Admin | Updated: August 4, 2014 23:39 IST2014-08-04T23:39:25+5:302014-08-04T23:39:25+5:30

शहरातील आबालवृद्धांना निवांत फिरता यावे यासाठी बसस्थानकाजवळ १३ लाख रुपये खर्च करुन बाग निर्माण करण्यात आली. प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे या बागेचे तीनतेरा वाजले आहे.

Use for the illegal garden work in the original | मूल येथील बागेचा अवैध कामासाठी वापर

मूल येथील बागेचा अवैध कामासाठी वापर

मूल : शहरातील आबालवृद्धांना निवांत फिरता यावे यासाठी बसस्थानकाजवळ १३ लाख रुपये खर्च करुन बाग निर्माण करण्यात आली. प्रशासनाच्या दुर्लक्षीतपणामुळे या बागेचे तीनतेरा वाजले आहे. सध्या या बागेचा अवैध कामांसाठी वापर केला जात आहे.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता मूल शहरात बगीचाची आवश्यकता होता. आमदार शोभाताई फडणवीस यांच्या प्रयत्नातून १३ लाख रुपये खर्च करुन बाग तयार करण्यात आली. बालकांपासून तर आबालवृद्धांना या बागेचा आनंद लुटता येईल व काही काळ विरंगुळा होईल या हेतून तयार करण्यात आलेल्या बागेकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सध्या येथे अवैध कामे सुरु आहे. सध्या बागेमध्ये जनावरे चरत असून काही नागरिक येथे शौचास जातात. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य परसले आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेने या बागेला ग्रहन लागले आहे.
या बागेच्या देखभाल दुरुस्तीकडे अक्षरश: दुर्लक्ष केल्या जात आहे. ज्यावेळी बाग उभारण्यात आली तेव्हा शहराची एक वेगळी ओळख निर्माण होईल, अशी अपेक्षा नागरिकांची होती. मात्र नागरिकांची अपेक्षा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे फोल ठरली आहे. बागेच्या सुरक्षिततेसाठी कोणतेही उपाययोजना करण्यात येत नसल्याने अनेकवेळा नागरिक याचा दुरुपयोग करीत आहे. भविष्यात एखादी मोठी अनुचित घटनाही येथे घडू शकते.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Use for the illegal garden work in the original

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.