शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर, नागभीड तालुक्यात युरिया खताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST

नागभीड तसेच चिमूर तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी नागभीड तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. तर चिमूर तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. यावर्षी सुरूवातीला पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली होती.

ठळक मुद्देधानपिकासाठी शेतकऱ्यांची धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड / नेरी : सद्यस्थितीत धान पिकाला युरीया खताची आवश्यकता असताना नेमक्या याचवेळी युरीया खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मिळेल त्या भावाने शेतकरी खताची खरेदी करीत आहे. यामध्ये मात्र शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.नागभीड तसेच चिमूर तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्रफळापैकी नागभीड तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. तर चिमूर तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करण्यात येते. यावर्षी सुरूवातीला पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली होती. मात्र त्यानंतर हंगामयोग्य पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी रोवणे केले आहे.रोवणे आटोपल्याने आणि पाऊसही धान पिकास पूरक असल्याने सद्यस्थितीत धानाचा हंगाम अतिशय भरात आला आहे. या पिकास आता युरीया खताची आवश्यकता आहे. नेमक्या याचवेळी बाजारात युरीय खताचा तुटवडा निर्माण झाला आहे.शेतकरी खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात जात आहे. मात्र कृषी केंद्र संचालकांकडे युरीया उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.स्थानिक कृषी केंद्र संचालकांना विचारणा केली असता, तालुक्यात खतांचा पुरवठा कमी झाल्याचे सांगितले. यासंदर्भात तालुका कृषी अधिकाºयाकडे संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.मागील काही दिवसांपासून नागभीड येथे युरीया खताची टंचाई आहे. कृषी केंद्र संचालकांकडे युरीया खत घेण्यासाठी गेल्यानंतर खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. मागील काही दिवसांपासून हिच स्थिती असल्यामुळे धान पिकांना कोणते खत द्यायचे हा प्रश्न आहे.- संजय माकोडेशेतकरी, मांगली

टॅग्स :agricultureशेती