आयसीयू, बेबी केअर युनिट अपडेट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:23 IST2021-01-15T04:23:27+5:302021-01-15T04:23:27+5:30

मनसेचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे यांना निवेदन चंद्रपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील आयसीयू व ...

Update ICU, Baby Care Unit | आयसीयू, बेबी केअर युनिट अपडेट करा

आयसीयू, बेबी केअर युनिट अपडेट करा

मनसेचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे यांना निवेदन

चंद्रपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील आयसीयू व बेबी केअर युनिट अपडेट करण्यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर हुमणे यांना निवेदन दिले.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू बेबी केअर युनिट यंत्रणा, विद्युत मेडिकल उपकरणांसंदर्भात चौकशी करण्यात आली. आयसीयू व बेबी केअर युनिट तत्काळ अपडेट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरसेवक सचिन भोयर यांनी केली. आयसीयू व नवजात शिशू केअर युनिटचे फायर ऑडिट करून तपासणी करून कार्यान्वित करावी. शिशु केअर युनिटला आपत्कालीन फायर एक्झिट लावावे, आयसीयू व शिशू केअर युनिटचे संपूर्ण विद्युत पुरवठा करणारे वायरिंग उच्च दर्जाची वायर वापरून नव्याने करावे. नव्याने ३ फेज आरसीसीबी लावावे. वापरण्यात येणारी स्वयंचलित वीज मेडिकल उपकरणे मानांकित एजन्सीद्वारे तपासून घ्यावीत, नवजात शिशू केअर युनिट २४ तास देखरेखीत असावे. इलेक्ट्रिशियन, प्रशिक्षित फायर फायटर नियुक्त करावेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कशा प्रकारे बचावकार्य करावे याचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष दिलीप रामेदवार, जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक सचिन भोयर, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भारत गुप्ता, राजू बघेल, जिल्हाध्यक्ष जनहित कक्ष, महिला जिल्हा उपाध्यक्ष माया मेश्राम, विधानसभा संघटक महेश शास्त्रकार, महिला शहराध्यक्षा प्रतिमा ठाकूर, वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष बळिराम शिंदे, वाहतूक सेना शहराध्यक्ष असलम शेख, प्राध्यापक नितीन भोयर, राकेश पराडकर, सुयोग धवलकर, स्वप्निल चहारे, शुभम सिंग, समीर शेख, मनीष दास, आदींची उपस्थिती होती.

Web Title: Update ICU, Baby Care Unit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.