चंद्रपूर मनपाच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 02:48 PM2021-07-29T14:48:13+5:302021-07-29T14:49:38+5:30

आमसभेत घुसून बॅनरबाजी करणारे काँग्रेस नगरसेवक आणि सत्ताधारी भाजप नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले.

unprecedented chaos in the general meeting of Chandrapur Municipal Corporation | चंद्रपूर मनपाच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ

चंद्रपूर मनपाच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ

googlenewsNext

चंद्रपूर : आमसभेत घुसून बॅनरबाजी करणारे काँग्रेस नगरसेवक आणि सत्ताधारी भाजप नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकले. एवढेच नाही तर स्थायी समिती सभापती रवी आसवानी आणि नंदू नागरकर यांनी एकदुसऱ्यांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या अभूतपूर्व गोंधळामुळे काही मिनिटे सभा तहकूब करण्यात आली. हा प्रकार गुरुवारी चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या आमसभेत घडला.

कोविडच्या पार्श्वभूमीवर मनपाची आज ऑनलाइन आमसभा आयोजित केली होती. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळात मनसेचे नगरसेवक सचिन भोयर अमृतच्या विषयावरून कार्यकर्त्यांसह सभागृहात प्रवेश करून निषेध नोंदवला. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनीही सभागृहात येऊन बॅनरबाजी केली. या प्रकाराला सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केला. तेव्हा काँग्रेस आणि सत्ताधारी भाजप नगरसेवक समोरासमोर आले. शाब्दिक बाचाबाची सुरू असतानाच सभापती आसवानी आणि नागरकर यांनी एक दुसऱ्यांवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. त्यानंतर महापौर यांनी काही मिनिटांसाठी सभा तहकूब केली.
 

Web Title: unprecedented chaos in the general meeting of Chandrapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.