हाॅटेलात नेऊन दोन नऊ वर्षीय मुलांसोबत केले अनैसर्गिक कृत्य; आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2022 21:02 IST2022-03-29T21:01:56+5:302022-03-29T21:02:33+5:30
Chandrapur News एका विकृत इसमाने खेळत असलेल्या दोन नऊ वर्षीय मुलांना चाॅकलेटचे आमिष दाखवून, शहरातीलच एका हाॅटेलात नेऊन त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.

हाॅटेलात नेऊन दोन नऊ वर्षीय मुलांसोबत केले अनैसर्गिक कृत्य; आरोपीला अटक
चंद्रपूर : एका विकृत इसमाने खेळत असलेल्या दोन नऊ वर्षीय मुलांना चाॅकलेटचे आमिष दाखवून, शहरातीलच एका हाॅटेलात नेऊन त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसात धाव घेऊन एकच गर्दी केली होती. या प्रकरणी श्रीधर मेंदू डकर (३७) रा.नागपूर याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत कलम ३६३, ३७७ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
महात्मा फुले वार्डातील चौकात दोन नऊ वर्षांची मुले त्यांचे आई-वडील आठवडी बाजारात गेल्याने खेळत होती. श्रीधर मेंदू डकर हा पूर्वी सिंदेवाहीतच राहात असल्याने तो परिचयाचा होता. तो काही नागरिकांसोबत बोलत होता. नागरिक तेथून निघून जाताच, तो खेळत असणाऱ्या दोन मुलांकडे गेला. त्यांना चॉकलेट व नवीन सँडल घेण्याचे आमिष दाखवून सिंदेवाहीतीलच मनमंदिर नावाच्या हॉटेलात घेऊन गेला. ही मुले आपल्या बहिणीची असल्याचे कारण त्याने हॉटेल मालकाला सांगितले. गाडी घ्यायची असल्याच्या नावावर हॉटेलमध्ये एका तासाकरिता खोली घेतली. खोलीत जाऊन त्याने त्या दोन्ही मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य केले. त्यातील एक मुलगा पळून जाण्यात यशस्वी ठरला. त्याने हॉटेलच्या मालकाला संपूर्ण हकिकत सांगितल्यानंतर, काही नागरिकांच्या माध्यमातून पोलिसांना फोन करण्यात आला. पोलिसांनी हाॅटेलात धाव घेऊन श्रीधर डकर याला ताब्यात घेतले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
त्याच्या सतर्कतेने घटना उघड
दोन मुलांपैकी एक मुलगा हाॅटेलाच्या खोलीतून बाहेर जाण्यास यशस्वी झाला. यानंतर, त्याने घडलेला प्रकार हाॅटेल मालकाला सांगितला. हाॅटेल मालकांनी सतर्कतेने त्याला खोलीत बंद केले. यानंतर, काही लोकांना सोबत घेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली.