अज्ञात व्यक्तीने तीन आॅटो पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:56 IST2019-03-06T22:56:12+5:302019-03-06T22:56:33+5:30

मागील दहा दिवसांपूर्वी चंद्रपुरातील हिरेंद्र अपार्टमेंटमध्ये चार दुचाकी जाळल्याची घटना ताजी असतानाच रयतवारी कॉलरी परिसरात मंगळवारी रात्री एक आॅटोरिक्षा व बुधवारी रात्री दोन आॅटोरिक्षा अज्ञात व्यक्तीने पेटविले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

An unknown person lit three autos | अज्ञात व्यक्तीने तीन आॅटो पेटविले

अज्ञात व्यक्तीने तीन आॅटो पेटविले

ठळक मुद्देरयतवारीतील घटना : नागरिकांमध्ये दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील दहा दिवसांपूर्वी चंद्रपुरातील हिरेंद्र अपार्टमेंटमध्ये चार दुचाकी जाळल्याची घटना ताजी असतानाच रयतवारी कॉलरी परिसरात मंगळवारी रात्री एक आॅटोरिक्षा व बुधवारी रात्री दोन आॅटोरिक्षा अज्ञात व्यक्तीने पेटविले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
२५ फेब्रुवारीला हिरेंद्र अपार्टमेंटमध्ये चार दुचाकी अज्ञात व्यक्तीने जाळल्या होत्या. सदर युवक सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळला होता. रामनगर पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत असतानाच रयतवारी कॉलरी परिसरात मंगळवारी व बुधवारी रात्री रयतवारी कालरी येथील रहिवासी मो. कलाम शेख, अशोक गुप्ता व जमाल शेख यांच्या मालकीचे आटो एमएच ३४ डी ८१६८, एमएच ३४ डी ७९१८ व एमएच ३४ बीएच ०९३७ हे तिन्ही अ‍ॅटोरिक्षा अज्ञात व्यक्तीने पेटविले. याबाबतची तक्रार रामगनर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. वाहने जाळण्याची घटना सतत घडत असल्याने वाहन चालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आरोपीला त्वरीत अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: An unknown person lit three autos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.