शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जटपुरा गेट वाहतूक कोंडीविरुद्ध संघटनांची एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:51 IST

चंद्रपूर : महानगरातील जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. ...

चंद्रपूर : महानगरातील जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे या समस्येवर चर्चा व उपाय शोधण्यासाठी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या पुढाकारातून चंद्रपुरातील विविध सामाजिक संघटनांची एकजूट झाली आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी भारती हॉस्पिटलमध्ये ॲड. प्रशांत खजांची यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध वास्तुविशारद रमाणिकभाई चव्हाण, सीबीएसएसचे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा उपस्थित होते.

बैठकीत जटपुरा गेटवरील वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय शोधण्यासाठी चर्चा करण्यात आली. आर्किटेक्ट रमणिकभाई चव्हाण यांनी यासंदर्भात २० वर्षांपासून आपण राजकीय नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वाहतूक आराखडा तयार करून दिल्याचे सांगितले. तो आराखडा यावेळी त्यांनी समजावून सांगितला. ॲड. प्रशांत खजांची यांनी यासंदर्भात कायदेशीर बाबी समाजावून सांगत सर्व संघटनांनी एकत्र येऊन लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन केले. युवा आर्किटेक्ट आनंद मुंधडा यांनी रस्त्यात किंचित बदल करून एक आराखडा तयार केला. यावर सर्वांचे जवळपास एकमत झाले. डॉ. गोपाल मुंधडा यांनी बैठकीची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी एमआयडीसी असोशिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, स्नेहकिंतचे अध्यक्ष डॉ. राजीव देवईकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रामजीवन परमार, ज्येष्ठ नागरिक संघाचे किशन झाडे, विजय चंदावर, संगीडवार, माणिकराव गोहोकार, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेश उचके, रोटरी क्लब चांदा फोर्टचे अध्यक्ष अनिल व्यास, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्याम धोपटे, माजी अध्यक्ष डॉ. मनीष मुंधडा, जेसीआयचे अध्यन आनंद मुंधडा, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल माडूरवार, दंतरोग तज्ज्ञ डॉ. श्याम गुंडावार, रेडक्रॉसचे डॉ. भानुदास दाभेरे, आयएमएचे डॉ. बालमुकुंद पालीवाल, डॉ. किरण देशपांडे, डॉ. भूपेश भलमे, डिजिटल मीडियाचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, व्हाईस ऑफ युथ क्लबचे अध्यक्ष अरविंदरर्सिग धुन्ना, विठाई संस्थेच्या संजीवनी कुबेर, वनश्री मेश्राम, डॉ. सपन दास, शिशिर हालदार, ॲड. आशिष मुंधडा आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. किरण देशपांडे तर आभार वनश्री मेश्राम यांनी मानले.