शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीअभावी बेरोजगारीत वाढ

By admin | Updated: October 22, 2014 23:16 IST

पोंभुर्णा तालुका धानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाने दगा

चंद्रपूर : पोंभुर्णा तालुका धानासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या तालुक्यात सिंचनाची पाहिजे तशी व्यवस्था नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना निसर्गावर अवलंबून राहूनच शेती करावी लागते. निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे युवक शेतीकडे न वळता इतर रोजगारांच्या शोधात आहेत. मात्र, या परिसरात एमआयडीसी किंवा अन्य उद्योग नसल्याने बेरोजगारांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. नव्याने राज्यात सत्तेत येणाऱ्या सरकारने तरी तालुक्यात उद्योग किंवा एमआयडीसी स्थापन करावे, अशी मागणी येथील नागरिकांसह महाविद्यालयीन युवकांनी केली आहे. तालुका निर्मितीला १५ वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र, आजही पाहिजे तशा सोयीसुविधा तालुक्यात उपलब्ध नसल्याने नागरिकांना रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. ७१ गावांचा समावेश असलेल्या तालुक्यात आजघडीला एकही उद्योग नाही. वैनगंगा, अंधारी नदीच्या पाण्यावर सिंचनाची तसेच उद्योग उभारल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळू शकते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्याची लोकसंख्या ५० हजार ७८१ आहे. दवर्षी महाविद्यालयीन शिक्षण, आयटीआयमधून प्रमाणपत्र घेऊन शेकडो विद्यार्थी बाहेर पडतात. पदवीधरांची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ होत आहे. व्यावसायिक शिक्षण घेतलेल्या तालुक्यातील बेरोजगारांना पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी फार कमी प्रमाणात नोकरी मिळाली आहे. डी.एड., बी.एड. बीपीएड, एम.ए., एम.एड. शिक्षण घेतलेल्या पदव्युत्तरांना नोकरी मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. बेरोजगारांना त्यांच्या शिक्षणाचा फायदा व्हावा ते स्वयंनिर्भर व्हावे यासाठी शासनाने योजना सुरू केल्या आहेत. परंतु येथे आजघडीला अनेक तरुण बेरोजगारीचे जीवन जगत आहेत. तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ३० हजार ९८४ हेक्टर आहे. ३२ ग्रामपंचायती असून ७१ गावांचा समावेश आहे. तालुका निर्मितीला १५ वर्षाचा काळ लोटला. या आदिवासीबहुल मागास तालुक्यात एकही मोठा उद्योग नसल्याने परिसरातील बेरोजगारांना मिळेल ते काम करुन जगावे लागत आहे. तालुक्यामध्ये वैनगंगा व अंधारी या नद्यांचे स्त्रोत लाभले आहे. या नद्यांच्या पाण्यावर एखादा मोठा उद्योग उभा राहिल्यास बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. तालुक्यातील रोजगारांना प्रशिक्षण देऊन बँकांच्या पतपुरवठ्यासाठी शासनस्तरावर पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. लघु उद्योग मंडळाकडून लघु उद्योग उभारणीला मार्गदर्शन करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. पोंभुर्णा तालुका मागासलेला आहे. केवळ धानशेतीवर अनेक शेतकरी अवलंबून आहे. मात्र, निसर्ग साथ देत नसल्याने हा व्यवसायही डबघाईस आला आहे. शासनाने या तालुक्याकडे लक्ष द्यावे. (स्थानिक प्रतिनिधी)