चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार पुलाखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:45 IST2019-05-30T00:43:55+5:302019-05-30T00:45:39+5:30
भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार दुचाकीवरून उसळून पुलाखाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास येथील बसस्थानकाजवळील उड्डाणपुलावर घडली.

चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार पुलाखाली
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : भरधाव जाणाऱ्या चारचाकी वाहनाने एका दुचाकीस्वाराला धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार दुचाकीवरून उसळून पुलाखाली पडला. यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना आज बुधवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास येथील बसस्थानकाजवळील उड्डाणपुलावर घडली. दत्तू महादेव नगराळे (४८) रा. हवेली गार्डन असे जखमीचे नाव आहे. दत्तू नगराळे हे बुधवारी सकाळी रेल्वेस्टेशनकडून जटपुरा गेटकडे आपल्या दुचाकीने (क्रमांक एमएच ३४ एझेड ६९३६) जात होते. दरम्यान, बसस्थानकाजवळील उड्डाणपुलावर मागून येणाºया चारचाकी वाहनाने त्याला धडक दिली. धडक एवढी जबर होती की दत्तू दुचाकीवरून उसळून उड्डाणपुलाच्या खाली कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले. वाहनचालक जीवन नानाजी लांजेकर (४३)रा., घुग्घूस याला अटक केली आहे.