शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांवर पुन्हा अशैक्षणिक कामे

By admin | Updated: October 10, 2015 00:15 IST

अशैक्षणिक कामांचा बोजा पुन्हा शिक्षकांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांत असंतोष पसरला असून अशैक्षणिक कामे काढण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे.

असंतोष : बहिष्काराचा पवित्रा, तहसीलदारांना निवेदन आयुधनिर्माणी (भद्रावती) : अशैक्षणिक कामांचा बोजा पुन्हा शिक्षकांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांत असंतोष पसरला असून अशैक्षणिक कामे काढण्याची मागणी शिक्षक संघटनेने केली आहे.न्यायाची पाड अन्यायाची चीड या तत्त्वानुसार काम करणारी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखा भद्रावतीने राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करण्यासाठी प्राथमिक शिक्षकांना प्रगणक म्हणून दिलेल्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात यावेत या आशयाचे निवेदन तहसीलदार भद्रावती यांना दिले आहे.मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा अभिनव उपक्रम सन २०१५ ते २०१७ या कालावधीत सक्रियपणे राबविण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरीय सर्व जिल्हा परिषद शाळेत सदर उपक्रमाची कार्यवाही सक्रियपणे सुरु आहे. तसेच शाळांचा दर्जा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी नवचेतना मिशन प्रकल्प जिल्ह्यात राबविला जात आहे. दिवाळी पूर्वी प्रथम सत्र परिक्षा घेणे, माहिती सरल प्रक्रियेत समाविष्ट करणे आहे या शिवाय शालेय पोषण आहार योजना, बांधकाम शाळेची संपूर्ण माहिती सरल प्रक्रियेद्वारे आॅनलाईन भरणे. इत्यादी कामे मुख्याध्यापकासह शिक्षकांना करावी लागत आहे. बालकाचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क अधिनियम २००१ (आरटीई) नुसार शिक्षकांना दशवार्षिक जनगणना आणि वेळोवेळी येणाऱ्या निवडणुका या व्यतिरिक्त अन्य कोणतेही अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांना नेमता येणार नाही, अशा सूचना असतानाही महसूल विभागाने शिक्षकांवर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्यावत करण्याची काम लादले आहे. या कामांतर्गत राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर तयार करणे शिक्षकांना घरोघरी जाऊन अर्ज भरायचे आहे. त्यात संपूर्ण कुटुंबाची माहिती भरायची असून त्याला आधार कार्ड क्रमांकाची जोडणी करायची आहे. या कामासाठी तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना प्रगणक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. सदर कामाचे स्वरूप पाहता शैक्षणिक कामांवर परिणाम होण्याची शक्यता असून ही कामे वगळण्याची मागणी आहे. (वार्ताहर)