नॅशनल कुंग-फु कराटे स्पर्धेत उमरी पोतदार संघ विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:27 IST2021-04-11T04:27:13+5:302021-04-11T04:27:13+5:30
भद्रावती : नुकत्याच झालेल्या तिसऱ्या ‘नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप २०२१-२२’ स्पर्धेमध्ये उमरी पोतदार (ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) येथील ...

नॅशनल कुंग-फु कराटे स्पर्धेत उमरी पोतदार संघ विजयी
भद्रावती : नुकत्याच झालेल्या तिसऱ्या ‘नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप २०२१-२२’ स्पर्धेमध्ये उमरी पोतदार (ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) येथील मुलांनी विजयी होऊन स्वतःसोबत गावाचे नाव उंचावले. या स्पर्धेत एक सुवर्ण, दोन रजत आणि डेमोमध्ये पहिले बक्षीस ट्रॉफी प्राप्त केली. या खेळाडूंना मास्टर मुकेश तांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत उमरी पोतदार (ता. पोंभुर्णा) येथील कोमल पेंदोर, अंकुश उराडे, स्वप्नील ठाकरे, महेश कुलमेथे, अमित कुंभरे, वैभव ठाकरे, आशिष साऊलकर, अजिंक्य कुंभरे, अनिल सतार हे सहभागी झाले होते. ही स्पर्धा वरोरा येथे आयोजित केली होती. तिसरी नॅशनल ओपन कुंग-फु कराटे चॅम्पियनशिप २०२१-२२चे आयोजक मास्टर प्रवीण रामटेके यांनी कोरोनासारख्या विषाणूचे संक्रमण होऊ नये म्हणून चांगल्याप्रकारे उपाययोजना केल्या होत्या.