शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वडेट्टीवार आणि धानोरकरांच्या गटबाजीत उद्धवसेनेच्या आशा पल्लवित ! गटनेतेपदावरूनही संघर्ष तीव्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 16:12 IST

Chandrapur : काँग्रेसच्या २७ नगरसेवकांपैकी तब्बल १८ नगरसेवक आपल्या सोबत असल्याचा दावा वडेट्टीवार गटाकडून करण्यात येत असून, या संख्येत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काँग्रेसच्या २७ नगरसेवकांपैकी तब्बल १८ नगरसेवक आपल्या सोबत असल्याचा दावा वडेट्टीवार गटाकडून करण्यात येत असून, या संख्येत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. काँग्रेसमधील अंतर्गत भांडणात उद्धवसेनेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, या दिशेनेही हालचाली वाढल्याची सुत्रांची माहिती आहे. या परिस्थितीत भाजप 'वेट अॅन्ड वॉच'च्या भूमिकेत दिसत आहेत.

वडेट्टीवार गटाला बसपाचा एक नगरसेवक निश्चित पाठिंबा देत आहे. शिवाय उद्धवसेनेचे सहा नगरसेवक तसेच वंचितचे दोन व दोन अपक्ष नगरसेवकांशी सकारात्मक चर्चा सुरू आहे. ३ नगरसेवक असलेल्या प्रहार जनसेना (भाशेकाप) चे पप्पू देशमुख काँग्रेससोबत जाण्यास अनुकूल आहेत. या सर्व समीकरणांच्या आधारावर काँग्रेसची सत्ता मनपावर स्थापन करण्याचे गणित वडेट्टीवार गटाकडून जुळविले जात असल्याची या गटातील माहिती आहे. धानोरकर गटही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र, हे दोन्ही एकत्र न आल्यास सत्तेचा सारीपाट उद्धवसेनेसाठी अनुकूल होत असल्याचे संकेत उद्धवसेनेकडून मिळत आहे. दरम्यान, गटनेतेपदावरूनही काँग्रेसमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. काँग्रेस २७ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरला असला तरी अद्याप अधिकृत गटनेता निवडलेला नाही. धानोरकर गटाकडून सुरेंद्र अडबाले यांच्या नावाचा दावा नागपूर विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात केवळ १३ नगरसेवक सोबत असल्याचे समोर आल्यानंतर वडेट्टीवार गटातील १४ नगरसेवकांनी आक्षेप नोंदविल्याने गट स्थापन होऊ शकला नाही.

दिल्लीत उद्या तोडगा निघण्याची शक्यता

काँग्रेस नेते के.सी. वेणूगोपाल यांनी ३ तारखेला दुपारी १२ वाजता दिल्ली येथे महत्त्वपूर्ण बैठक बोलाविली आहे. या बैठकीस खासदार प्रतिभा धानोरकर, गटनेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र सहप्रभारी कुणाल चौधरी तसेच माजी मंत्री सुनील केदार यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती आहे. या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आज काँग्रेस, भाजप गटनेता निवडणार

सोमवार, २ फेब्रुवारी रोजी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांचे गटनेते ठरणार आहेत. भाजपकडून शेखर शेट्टी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसमध्ये वडेट्टीवार गटाकडून राजेश अड्डूर व वसंत देशमुख यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. अडबालेंसाठी धानोरकर गट कोणती भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समृद्धीवरील प्रकार धानोरकर गटासाठी डोकेदुखी ?

२९ जानेवारी रोजी समृद्धी महामार्गावर धानोरकर गटाकडून वडेट्टीवार गटातील नगरसेवकांची बस अडविण्यात आल्याचा प्रकार घडला. यामुळे काँग्रेस श्रेष्ठींमध्ये चुकीचा संदेश गेल्याचे बोलले जात असून, हा प्रकार धानोरकर गटासाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अवघे काहीच दिवस शिल्लक; तरीही संभ्रमावस्था

गटनेते निवडीनंतर दि. ५ फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदासाठी नामनिर्देशन दाखल होणार आहे. मात्र, अवघे काही दिवस शिल्लक असताना सुरू असलेल्या गटबाजीमुळे गटनेता आणि महापौरपद नेमके कोणाच्या हाती जाणार, हे सांगणे अवघड झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Internal Congress conflict in Chandrapur boosts Uddhav Sena's mayoral hopes.

Web Summary : Chandrapur Congress faces internal strife over leadership, benefiting Uddhav Sena. Wadetttiwar faction claims majority support, while Dhanorkar group faces setbacks. Delhi meeting scheduled to resolve the conflict. BJP adopts a wait-and-see approach as power struggle intensifies.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेस