शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचा काँग्रेसला मोठा झटका, भाजपासोबत युती! संगीता खांडेकर महापौर, उद्धवसेनेला काय मिळणार?

By राजेश भोजेकर | Updated: February 10, 2026 11:47 IST

Chandrapur Municipal Mayor Election 2026: चंद्रपूर महापालिकेच्या निमित्ताने उद्धवसेना आणि भाजपा याची युती पुन्हा झाली आहे. काँग्रेसकडून ताणले जात असल्याने उद्धवसेनेने ऐनवेळी भाजपासोबत जात सत्ता स्थापनेची घोषणा केली. 

- राजेश भोजेकर, चंद्रपूर चंद्रपूर महानगरपालिकेच्या आज होणाऱ्या महापौरपदाच्या निवडणुकीचा सस्पेन्स अखेर संपला. भाजपा आणि उद्धवसेना यांच्यात सत्ता समझोता झाला आहे. ठरलेल्या करारानुसार महापौरपदभाजपाकडे, तर उपमहापौरपद उद्धवसेनेकडे देण्यावर दोन्ही पक्षांत सहमती झाली आहे. ऐनवेळी झालेल्या पडद्यामागील घडामोडींमुळे हे सत्ता समीकरण अंतिम झाले. उद्धवसेनेला भाजपाने सव्वा वर्षे महापौर पद देण्याचे मान्य केले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी याबद्दलची माहिती दिली. 

निवडणुकीआधी भाजपाने आपल्या उमेदवारासाठी अधिकृत व्हीप जारी करत आक्रमक भूमिका घेतली होती. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपने शिस्तबद्ध मतदानाची रणनीती आखली. दुसरीकडे काँग्रेसकडून उद्धवसेनेला सोबत घेण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र महापौरपदावर ठाम असलेल्या उद्धवसेनेने मंगळवारी (१० फेब्रुवारी) आमदार किशोर जोरगेवार यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत अखेर उपमहापौरपद स्वीकारत सत्ता समझोत्याला हिरवा कंदील दिला.

काँग्रेसचे गणित फसले

काँग्रेसकडे संख्याबळ असूनही स्पष्ट बहुमत न जमल्याने सत्ता स्थापनेचे गणित बिघडले. नागपूर आणि चंद्रपूर येथे वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, थेट हस्तक्षेप आणि वाटाघाटी करूनही काँग्रेसला यश आले नाही. उद्धवसेनेने भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस विरोधातच राहिली.

व्हीप ठरला निर्णायक

मतदानाआधी भाजपने जारी केलेला व्हीप हा निकालाचा निर्णायक घटक ठरला. भाजपा आणि शिंदेसेनेच्या नगरसेवकांनी एकजुटीने मतदान करत महापौरपद भाजपाकडे खेचून आणले. उपमहापौरपद उद्धवसेनेला देऊन सत्तेत सहभागी करून घेण्याची भाजपाची रणनीती यशस्वी ठरली.

मनपात सत्तेचा नवा अध्याय

भाजपाचा महापौर आणि उद्धवसेनेचा उपमहापौर या समीकरणामुळे चंद्रपूर महानगरपालिकेत सत्तेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. विकासकामे, स्थायी समिती आणि प्रशासनावर वर्चस्वासाठी पुढील काळात राजकीय हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे. अखेर, ऐनवेळी झालेल्या सत्तासमझोत्यामुळे चंद्रपूर मनपात भाजप सत्तेत राहिला असून, उद्धवसेना उपमहापौरपदाच्या माध्यमातून सत्तेत सहभागी झाली आहे.

महापालिकेतील सत्तेचे वाटप कसे?

आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले की, पहिले सव्वा वर्ष महापौर भाजपाचा असेल, नंतरचे सव्वा वर्षे महापौर उद्धवसेनेचा असेल. 

उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे म्हणाले की, "काँग्रेस आम्हाला शेवटच्या वर्षातही महापौर द्यायला तयार नव्हती. त्यामुळे आम्हाला भाजपासोबत जावे लागले. नंतरच्या सव्वा वर्षात महापौर उद्धवसेनेचा असेल. पाच वर्षे उपमहापौर उद्धवसेनेचा असेल. स्थायी समितीही पहिले एक वर्ष आणि शेवटचे एक वर्ष उद्धवसेनेकडे असेल", अशी माहिती गिऱ्हे यांनी दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur: Shiv Sena (UBT) allies with BJP, Congress loses out.

Web Summary : In Chandrapur, Shiv Sena (UBT) allied with BJP for mayoral post, sidelining Congress. BJP gets first term, Sena later. Sena secures Deputy Mayor post and committee positions. Congress failed to secure majority.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Mayorमहापौरcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना