रेल्वेचे डबे घसरल्याचा प्रकार माकड्रील निघाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:28 IST2020-12-22T04:28:04+5:302020-12-22T04:28:04+5:30
त्याचे झाले असे की संध्याकाळचे साडेचार वाजले असतील. येथील रेल्वे विभागाला नागभीड ब्रम्हपुरी दरम्यान मालवाहू गाडीचे तीन डब्बे रूळावरून ...

रेल्वेचे डबे घसरल्याचा प्रकार माकड्रील निघाले
त्याचे झाले असे की संध्याकाळचे साडेचार वाजले असतील. येथील रेल्वे विभागाला नागभीड ब्रम्हपुरी दरम्यान मालवाहू गाडीचे तीन डब्बे रूळावरून घसरले. एवढेच नाही तर त्यात काही व्यक्तींचा मृत्यूही झाला, असा संदेश मिळाला आणि रेल्वेचे संपूर्ण विभाग खडबडून जागा झाला आणि प्रत्येक विभाग परिस्थितीचा सामना करण्यासाठी मिळेल त्या वाहनाने घटनास्थळाकडे धाव घेऊ लागला. यात रेल्वे पोलीस, वैद्यकीय विभागासह विविध विभागांचा समावेश होता. तोवर ही माहिती सोशल मीडियावरही व्हायरल झाल्याने सर्वत्र याच घटनेची चर्चा सुरू झाली. मात्र घटनास्थळी पोचताच हे माकड्रील असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
कोट
आपले अधिकारी व कर्मचारी कितपत सतर्क आहेत. याची परीक्षा रेल्वे विभाग वर्षातून एकदा घेत असतो. हा तोच प्रकार होता.
- पंकज गुप्ता , रेल्वे प्रभारी नागभीड