मुलींना विकणार्‍या दोन महिला गजाआड

By Admin | Updated: May 25, 2014 23:25 IST2014-05-25T23:25:44+5:302014-05-25T23:25:44+5:30

घरकामाचे आमिष दाखवून चार मुलींना चंद्रपुरातील वेश्या व्यवसायातील दलालांना प्रत्येकी दहा हजार रुपयांमध्ये विकणार्‍या दोन महिलांना शनिवारी रात्री आंध्र प्रदेशातील वरंगल येथून अटक करण्यात आली.

Two women selling jewelery to girls | मुलींना विकणार्‍या दोन महिला गजाआड

मुलींना विकणार्‍या दोन महिला गजाआड

वेश्या व्यवसाय : आंध्र प्रदेशातून केली अटक

चंद्रपूर: घरकामाचे आमिष दाखवून चार मुलींना चंद्रपुरातील वेश्या व्यवसायातील दलालांना प्रत्येकी दहा हजार रुपयांमध्ये विकणार्‍या दोन महिलांना शनिवारी रात्री आंध्र प्रदेशातील वरंगल येथून अटक करण्यात आली. त्यामुळे मुलींच्या तस्करीची आणखी काही प्रकरणे उजेडात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राणी श्यामकुमार कोंडा (३0) व स्वरूपा देवरा सुरय्या (४0) अशी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहेत. या दोघीही वरंगल येथील मिल्क कॉलनी भागातील रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कविता फुसे यांच्या नेतृत्वात सुरेश केमेकर, आनंद परचाके व अफसर पठाण यांचा समावेश असलेले विशेष पथक शनिवारी रात्री वरंगल येथे पोहचले. तेथे या महिलांना त्यांच्या घरूनच ताब्यात घेण्यात आले. त्यांना चंद्रपुरात आणल्यानंतर या प्रकरणातील सत्य उजेडात आले.

तीन महिन्यांपूर्वी राणी कोंडा व स्वरूपा सुरय्या या दोन महिलांनी वरंगल येथील वेगवेगळ्या परिसरातील चार मुलींच्या पालकांना गाठले. आम्ही तुमच्या मुलींना महाराष्ट्रात काम मिळवून देऊ, असे आमिष त्यांनी पालकांना दाखविले. परिस्थिती हलाखीची असल्याने पालकांनाही मुलींना काम मिळणार असल्याचा आनंद झाला. त्यामुळे त्यांनीही कोणतेच आढेवेढे न घेता, या मुलींना या दोन महिलांच्या हवाली केले. त्यानंतर राणी व स्वरूपा या महिलांनी या मुलींना तीन महिने स्वत:चजवळ ठेवले.

तीन महिन्यानंतर चंद्रपुरातील वेश्या व्यवसायातील दलालांशी संपर्क साधून या मुलींना प्रत्येकी १0 हजार रुपयांमध्ये विकले. चंद्रपुरात आल्यानंतर या मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले. दरम्यान मागील आठवड्यात यातील एका मुलीने तेथून पळ काढून एका महिला सामाजिक कार्यकर्तीला गाठले व आपली व्यथा सांगितली. त्यानंतर पोलिसांनी या रॅकेटचा भंडाफोड केला. (प्रतिनिधी)

Web Title: Two women selling jewelery to girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.