दोन दुचाकींना ट्रकची धडक, दोन जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:12 IST2018-05-18T23:11:43+5:302018-05-18T23:12:25+5:30
मानोराकडून जाणाऱ्या ट्रकची उमरी जवळील पांढरीमाता नाल्याजवळ दोन दुचाकींना धडक बसली. या अपघात रिना महादेव सातपुते (३३) रा. घनोटी विहीरगाव व सचिन रघुनाथ कावळे हे दोघे ठार झाले. तर दहा वर्षाच्या मुलीसह तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता घडली.

दोन दुचाकींना ट्रकची धडक, दोन जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : मानोराकडून जाणाऱ्या ट्रकची उमरी जवळील पांढरीमाता नाल्याजवळ दोन दुचाकींना धडक बसली. या अपघात रिना महादेव सातपुते (३३) रा. घनोटी विहीरगाव व सचिन रघुनाथ कावळे हे दोघे ठार झाले. तर दहा वर्षाच्या मुलीसह तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजता घडली.
एमएच २९-८९१४ या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने मानोराकडून उमरीला जात होता. उमरीवरून मानोराकडे जाणारे महादेव सातपुते, त्यांची मुलगी सलोनी सातपुते (१०) व पत्नी रिना सातपुते हे तिघे जण एमएच ३४ एजी ६४३७ या क्रमांकाच्या तर त्यांच्या पुढे एमएच ३४ बीके ६९३२ या क्रमांकाच्या दुचाकीने पियुष मुर्लीधर जमदाळे व सचिन रघुनाथ कावळे रा. उमरी हे दोघे जात होते. ट्रकची पियुष व सचिन बसलेल्या दुचाकीला धडक बसली. त्यानंतर महादेव सातपुते यांच्या दुचाकीलाही उडविले. त्यात महादेव सातपुते यांची पत्नी रिना ट्रकच्या समोरील चाकात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील सर्व जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची वार्ता उमरीचे ठाणेदार प्रशांत मसराम यांना माहिती होताच घटनास्थळावर धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने चाकात दबलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. सर्व जण गंभीर जखमी असल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सचिन कावेळेचा मृत्यू झाला. पियुषचीही प्रकृती चिंताजनक आहे. ठाणेदार प्रशांत मसराम यांनी गुन्ह्याची नोंद केली असून घटनास्थळावरून ट्रक चालक व वाहक फरार झाले. त्यांची नावे कळलेली नाहीत. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.