नागपूरच्या दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:07+5:302021-03-31T04:28:07+5:30
चिमूर : पोलिसांनी दोन व्यक्तींना एसटी बसस्थानक परिसरात मोटारसायकलला छेडछाड करीत असल्याच्या माहितीवरून चौकशीसाठी ताब्यात घेतले असता मोटारसायकल चोरी ...

नागपूरच्या दोन मोटारसायकल चोरट्यांना अटक
चिमूर : पोलिसांनी दोन व्यक्तींना एसटी बसस्थानक परिसरात मोटारसायकलला छेडछाड करीत असल्याच्या माहितीवरून चौकशीसाठी ताब्यात घेतले असता मोटारसायकल चोरी उघडकीस आली. या प्रकरणी आशिष रमेश खडसंग (२८) व सचिन बाळकृष्ण शंभरकर (३१) (रा. भिवापूर, जि. नागपूर) या दोघांना अटक केली आहे.
दोन्ही आरोपींची न्यायालयातून पोलीस कोठडी मिळविली. महिनाभरापूर्वी चिमूर येथून लाल रंगाची मोटारसायकल चोरी केली. तसेच नागपूर येथून पाच मोटारसायकल चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली. सदर गुन्ह्यातील मोटारसायकल किंमत १ लाख ७० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रवींंद्र शिंदे, पो.ह. विलास निमगडे, पो.शि. विनायक सरकुंडे, सचिन खामनकर, शैलेंद्र मडावी, सचिन गजभिये यांनी पार पाडली.