दारूसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:19 IST2021-06-19T04:19:51+5:302021-06-19T04:19:51+5:30

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अवैध दारूसह एक लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

Two lakh items including liquor seized | दारूसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

दारूसह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात अवैध दारूसह एक लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील विविध ठिकाणी अवैध दारूविक्री सुरूच आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील उचली गावाजवळील रस्त्याच्या बाजूला झुडपी जंगलात अवैध दारूचा साठा ठेवला असल्याची माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळताच पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी असलेले दोन्ही आरोपी जंगलाच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळी चार पोत्यांमध्ये एक लाख ४८ हजार रुपये किमतीची दारू व ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली. यामध्ये समीर ढोंगे (वय २०), रा. उचली व हेमंत लोखंडे (२९), रा. हनुमाननगर, ब्रह्मपुरी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अंकुश आत्राम, पोलीस हवालदार रामटेके, मुकेश गजबे, प्रकाश चिकराम यांनी केली आहे.

===Photopath===

180621\img-20210618-wa0070.jpg

===Caption===

पोलिसांनी अटक केलेला आरोपी

Web Title: Two lakh items including liquor seized