दारूसह दोन लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:20 IST2021-06-26T04:20:38+5:302021-06-26T04:20:38+5:30

सदर कारवाई शुक्रवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली आहे. ब्रह्मपुरी पोलिसांच्या विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पवनी ते ब्रह्मपुरी ...

Two lakh 78 thousand items including liquor confiscated | दारूसह दोन लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

दारूसह दोन लाख ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त

सदर कारवाई शुक्रवारी सकाळच्या सुमारास करण्यात आली आहे. ब्रह्मपुरी पोलिसांच्या विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पवनी ते ब्रह्मपुरी मार्गावरील सावरला ते तोरगाव रस्त्यावर एका निळ्या रंगाच्या मारुती व्हॅनने ब्रह्मपुरी येथे अवैध दारूसाठा आणला जात आहे. त्या माहितीवरून विशेष पथकाने सापळा रचून मारुती व्हॅन ताब्यात घेतली व झडती घेतली असता त्यामध्ये एक लाख ७८ हजार ८०० रुपये किमतीचा अवैध देशी दारूचा साठा व दारू वाहतुकीकरिता वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा एकूण दोन लाख ७८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये सुरेश थेरे व बंडू शेंडे दोन्ही रा. सावरला तह.पवनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

===Photopath===

250621\img-20210625-wa0067.jpg

===Caption===

अवैध दारू व जप्त चारचाकी सोबत कार्यवाही करणारे पोलीस

Web Title: Two lakh 78 thousand items including liquor confiscated