शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी-बोलेरोच्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू, चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 16:48 IST

मनोज जुनघरे मित्र सुधाकर धोटे सोबत भाचीच्या लग्ना कार्यानिमित्त बहिणीच्या घरी वणी येथे देव पोहचवण्यासाठी गेले होते. तेथून परत गावाकडे येताना त्यांच्या दुचाकीला एमआयडीसी परिसरात बोलेरोने जोरदार धडक दिली.

चंद्रपूर : चंद्रपूर एमआयडीसी परिसरात दुचाकी-बोलेरोमध्ये जबर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू झाला. ही घटना चंद्रपूर एमआयडीसी परिसरात बुधवार ( ता.२२) सायंकाळी ६ वाजता घडली. 

सुधाकर लक्ष्मण धोटे (वय ४३) व मनोज गणपती जुनघरे ( वय ४७) रा. विसापूर ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर असे अपघातातमृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ते दोघेही जीवलग मित्र असून नेहमीच सोबत असायचे. दोघेही बिल्ट ग्राफिक्स पेपर मिलमध्ये नोकरीला होते. विसापूर येथील मनोज जुनघरे यांच्या भाचीचे २६ डिसेंबर रोजी लग्न ठरले होते. त्यानिमित्त मनोज मित्र सुधाकर धोटे सोबत बहिणीच्या घरी गेले होते.

दोघेही एम. एच.३४-बी. क्यू.०४१३ या दुचाकी ने वणी जि. यवतमाळ येथे भाचीच्या लग्न कार्यानिमित्त देव पोहचविण्यासाठी गेले होते. तेथील ख्याली खुशाली विचारून घुगुस मार्गाने विसापूरकडे येत होते. दरम्यान एमआयडीसी परिसरात मल्टी ऑर्गॅनिक कपंनीजवळील वळणावर बोलेरो वाहन क्रमांक एम. एच.३४-एम.२५४४ ने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार सुधाकर धोटे जागीच ठार झाले तर मनोज जुनघरे यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

मनोज जुनघरे हा सामाजिक कार्यकर्ता असून ओबीसी महासंघाचे सदस्य म्हणून सक्रिय होते.  त्यांनी भाचीच्या लग्नाला चांगला बेत आखला होता. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. ओबीसी महासंघाच्या चळवळीतील धडाडीचा कार्यकर्ता अचानक निघून गेल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. विसापूर गावात दोघांच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूcarकारbikeबाईक