कारसह दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

By Admin | Updated: May 15, 2016 00:38 IST2016-05-15T00:38:48+5:302016-05-15T00:38:48+5:30

तालुक्यातील चिचगाव बसस्थानकावर शनिवारी सकाळी कारमधून अवैधरित्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच .....

Two illegal liquor vendors arrested with the car | कारसह दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

कारसह दोन अवैध दारू विक्रेत्यांना अटक

ब्रह्मपुरी : तालुक्यातील चिचगाव बसस्थानकावर शनिवारी सकाळी कारमधून अवैधरित्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करीत मारोती व्हॅनसह आरोपी संजय गणपत कुंबेवार रा. तळोधी (बा) व संदीप भास्कर देशमुख रा. तळोधी (बा) यांना अटक केली.
मेंडकी परिसरात अवैध दारूचा महापूर आहे. जंगलात दारूचा साठा लपवून गावात दारूची विक्री करण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. कारद्वारे दारू आणली जात असल्याची माहिती मिळताच पीएसआय खैरकार व सहायक पीएसआय भास्कर पिसे यांनी पाळत ठेवून चिचगावच्या बस स्थानकावर कार (क्र. महा. ०४ डि.जे. ५७६३) मधून १२०० बॉटल ९० एमएलच्या देशी दारू जप्त केली. त्याची किंमत ४८ हजार रुपये आहे. याप्रकरणी आरोपी संजय गणपत कुंबेवार व संदीप भास्कर देशमुख रा. तळोधी (बा) यांना अटक करून त्यांचेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Two illegal liquor vendors arrested with the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.