वेडगावात दोन घरे जळून खाक, लाखोचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:29 IST2021-04-27T04:29:22+5:302021-04-27T04:29:22+5:30

गोंडपिपरी : आगीने पेट घेतल्याने दोन घरे जळून खाक झालीत. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथे सोमवारी चार ...

Two houses burnt down in Vedgaon, loss of millions | वेडगावात दोन घरे जळून खाक, लाखोचे नुकसान

वेडगावात दोन घरे जळून खाक, लाखोचे नुकसान

गोंडपिपरी : आगीने पेट घेतल्याने दोन घरे जळून खाक झालीत. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील वेडगाव येथे सोमवारी चार वाजताच्या सुमारास घडली. गावकऱ्यांनी पुढाकार घेत आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत रमेश ऐणगंटीवार, दिवाकर ऐणगंटीवार यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वेडगाव येथील रमेश ऐणगंटीवार, दिवाकर ऐणगंटीवार यांच्या घरी आगीने पेट घेतला. बघता बघता आगीचा भडका वाढला. आरडाओरड केल्याने गावकरी धावून आले. मोठ्या प्रयत्नाने आग विझविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत घराची राखरांगोळी झाली होती. या आगीत दोन्ही भावंडाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. ऐन लाॅकडाऊनच्याचा काळात घराची राखरांगोळी झाल्याने ऐणगंटीवार कुटुंबीयावर मोठे संकट कोसळले आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.

Web Title: Two houses burnt down in Vedgaon, loss of millions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.