विदेशी कट्ट्यांसह दोन अट्टलगुन्हेगारांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:48+5:30

विशेष म्हणजे, या आरोपींनी एकता नगर तेसलवासा येथे घरफोडी, घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिरात चोरी, माजरी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या खुटा परिसरातील घराची झडती घेतली असता ५ लाख ४३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींवर भद्रावती, घुग्घुस, माजरी येथे गुन्हे दाखल असून अनेक गुन्हे उघडकीस आले आहे.

Two convicts arrested with foreign gangs | विदेशी कट्ट्यांसह दोन अट्टलगुन्हेगारांना अटक

विदेशी कट्ट्यांसह दोन अट्टलगुन्हेगारांना अटक

ठळक मुद्देअनेक गुन्हे उघडकीस : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : माजरी येथील दोन अट्टल गुन्हेगारांना विदेशी कट्टा तसेच जिवंत काडतुसे घेऊन फिरत असताना पडोली परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शाहरूख अस्लम शेख (२२) आणि राकीब सगीर अहमद सिद्दीकी (२०) अशी आरोपींची नावे आहे.
माजरी पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्ह्यातील फरार आरोपी शाहरूख अस्लम शेख (२२), रा. बांदा दफाईन नं.२ माजरी आणि राकीब सगीर अहमजद सिद्दीकी (२०) रा. शिवाजीनगर माजरी हे दोघेही खुटाळा परिसरात एमएच ३४ के ८०३० या क्रमांकाच्या कारने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून एक विदेशी बनावटीचा कट्टा, चार जिवंत काडतुस, एक देशी बनावटीचा कट्टा, तलवार, चाकू यासह एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध पडोली पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे, या आरोपींनी एकता नगर तेसलवासा येथे घरफोडी, घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिरात चोरी, माजरी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या खुटा परिसरातील घराची झडती घेतली असता ५ लाख ४३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींवर भद्रावती, घुग्घुस, माजरी येथे गुन्हे दाखल असून अनेक गुन्हे उघडकीस आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, पोलीस उपनिरीक्षक विकास मुंढे, सचिन गदादे, केमेकर, संजय आतकुलवार, धनराज करकाडे, अमोल धंदरे, पोलास आतकुलवार, प्रशांत नागोसे, रवी पंधरे, जावेद सिद्दीकी, प्रफुल मेश्राम आदींनी केली.

Web Title: Two convicts arrested with foreign gangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.