शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दोन बालविवाहाचा घाट उधळला

By साईनाथ कुचनकार | Updated: June 7, 2024 17:22 IST

चाईल्ड हेल्पलाइन : जिल्हा बालसंरक्षण कक्षाची कार्यवाही

साईनाथ कुचनकार/ चंद्रपूरचंद्रपूर : पालकांच्या समुपदेशाने जिल्ह्यात एकाच दिवशी दोन बालविवाह रोखण्यात चाईल्ड हेल्पलाइन आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाला यश आले आहे. विशेष म्हणजे, जिवती तालुक्यातील ५ बालविवाह यावर्षी प्रशासकीय यंत्रणेने थांबविले आहे.

चंद्रपूरपासून दूर अंतरावर असलेल्या जिवती तालुक्यातील गावांमध्ये बालविवाह होत असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाइन च्या १०९८ क्रमांकावर मिळाली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी चंद्रपूर आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम दोनही बालिका अल्पवयीन असल्याचा पुरावा सहायक संरक्षण अधिकारी परविन शेख, अंगणवाडी सेविका व सुपरवायझर यांच्या मदतीने प्राप्त करण्यात आला. यानंतर चाइल्ड हेल्पलाइन आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे कर्मचारी दोन्ही बालिकेच्या बालविवाह होत असलेल्या गावात पोहचले. ग्रामीण बाल संरक्षण समिती सदस्यांच्या मदतीने दोन्ही बालविवाह थांबविले.

दोन्ही अल्पवयीन बालिकांच्या कुटुंबाकडून बालविवाह करणार नसल्याचे शपथपत्र लिहून घेण्यात आले. या संपूर्ण कारवाही दरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, चाईल्ड हेल्पलाइनचे अभिषेक मोहुर्ले, प्रकल्प समन्वयक प्रदीप वैरागडे, सुपरवायझर अंकुश उराडे, किरण बोहरा आणि जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या हर्षा वऱ्हाटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 

येथे करा तक्रारबालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास किंवा बालविवाह होत असल्यास १०९८ या चाईल्ड हेल्पलाइनवर संपर्क करा. या हेल्पलाइनवर माहिती द्या. यामुळे बालविवाह थांबविण्यास मदत होते. 

बालविवाह केल्यास जावे लागणार जेलमध्येमुला-मुलींचे बालविवाह केल्यास त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई केली जाते. जेलचीही हवा खावी लागू शकते. त्यामुळे आपल्या मुला-मुलींचे बालविवाह करू नये, जिथे असे प्रयत्न केले जाते. त्याचीही माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर