रेती चोरीतील दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 05:00 IST2020-03-02T05:00:00+5:302020-03-02T05:00:04+5:30
ट्रॅक्टर व रेती असा १२ लाख सहा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्या गुन्ह्यातील एका ट्रॅक्टरमालक व एका ट्रॅक्टर चालकाला शनिवारी अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपी फरार आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या रेती प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केल्याने धाबे दणाणले आहे.

रेती चोरीतील दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : येथील वर्धा नदीच्या घाटावरून रेती चोरी करून आणत असताना गेल्या आठवडयात घुग्घुस पोलिसांनी शेनगाव रस्त्यावर चार ट्रॅक्टर पकडले. या प्रकरणी सात चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या फरार आरोपीपैकी शनिवारी रात्री दोन आरोपींना अटक केली आहे.
ट्रॅक्टरचालक मारोती भोयर (३५) रा. वढा व ट्रॅक्टरमालक शांताराम भोयर (४०) रा. महाकुर्ला असे अटक केलेल्यांची नावे आहेत. १४ फेब्रुवारीला रात्री चार ट्रॅक्टर पोलीस उपनिरीक्षक नीलम डोंगरे यांनी रेती चोरी करताना पकडले. ट्रॅक्टर व रेती असा १२ लाख सहा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्या गुन्ह्यातील एका ट्रॅक्टरमालक व एका ट्रॅक्टर चालकाला शनिवारी अटक केली आहे. उर्वरित पाच आरोपी फरार आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या रेती प्रकरणात चोरीचा गुन्हा दाखल केल्याने धाबे दणाणले आहे.
रेती चोरून नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त
दुर्गापूर : चंद्रपूर वीज केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रातून अवैधपणे रेती चोरून नेणारे दोन ट्रॅक्टर शनिवारी दुर्गापुर पोलिसांनी जप्त करून पुढील कारवाईसाठी महसूल विभागास पाचारण केले आहे. चंद्रपूर वीज केंद्राच्या आंवडा गेट लगत असलेल्या हनुमान मंदिराच्या मागे जंगलात रेतीचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. येथून छुप्या पद्धतीने दररोज तस्कराद्वारे रेती चोरून नेली जात होती. याबाबत वीज केंद्र व्यवस्थापनाला गोपनीय माहिती मिळाली. व्यवस्थापनाच्या आदेशावरून शनिवारी येथील सुरक्षा विभागाने संबंधित ठिकाणी जात रेती चोरून नेणारे टक्टर पकडले.