३० पेट्या दारूसह दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:45+5:302021-06-10T04:19:45+5:30
चंद्रपूर : पडोली पोलिसांनी पीकअप वाहनातून ३० पेट्या देशी दारूसह पाच लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी ...

३० पेट्या दारूसह दोघांना अटक
चंद्रपूर : पडोली पोलिसांनी पीकअप वाहनातून ३० पेट्या देशी दारूसह पाच लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी रात्री केलेल्या या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली. अरविंद श्यामराव निवलकर (२३), मनोज नामदेव बुरांडे दोघेही राहणार बाबूपेठ वॉर्ड चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पडोली पोलिसांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वात ऑल आउट मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी पडोली पोलीस गस्तीवर असताना पीक अप क्रमांक एम एच बीजी ५४८५ क्रमांकाच्या वाहन संशयितरीत्या ठेवून पळून जाण्याच्या बेतात होते. परंतु, पडोली चौकात हजर असलेले पोलीस निरीक्षक एम.एम. कासार यांनी पथकासह पीकअप वाहनाकडे धाव घेऊन दोघांना पकडून वाहनाची तपासणी केली.
यावेळी वाहनात ३० पेट्या देशी दारू आढळून आली. पोलिसांनी सर्व दारू, वाहन, मोबाइल असा पाच लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली. ही कारवाई ठाणेदार एम.एम. कासार यांच्या नेतृत्वात, पोलीस कर्मचारी प्रकाश निखाडे, अजय दरेकर, किशोर वाकाटे, सादिक शेख आदींनी केली.