कोरोनाला वाकुल्या दाखवत अडीचशे जोडप्यांनी उडवला लग्नाचा बार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:27 IST2021-04-25T04:27:36+5:302021-04-25T04:27:36+5:30
मागील वर्षी कोरोनामुळे अनेकांना नियोजित तारखेला करण्यात येणारे विवाह सोहळे रद्द करावे लागले होते. अनेकांनी मंगल कार्यालयांकडे पैसेही जमा ...

कोरोनाला वाकुल्या दाखवत अडीचशे जोडप्यांनी उडवला लग्नाचा बार
मागील वर्षी कोरोनामुळे अनेकांना नियोजित तारखेला करण्यात येणारे विवाह सोहळे रद्द करावे लागले होते. अनेकांनी मंगल कार्यालयांकडे पैसेही जमा केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे सोहळे रद्द झाल्याने अनेक मंगल कार्यालय चालकांना पैसे परत करावे लागले.
बॉक्स
वर्षभरात ५५ लग्नतिथी
गतवर्षात तब्बल ५५ लग्नतिथी होत्या. मात्र कोरोनामुळे अनेकांनी आपले विवाह पुढे ढकलले. थाटामाटात लग्न सोहळा पार पाडावा, अशा अपेक्षेत असलेल्यांच्या आनंदावर यंदाही विरजण पडले. त्यामुळे विवाहेच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
बॉक्स
रजिस्टर्ड मॅरेजचा पर्याय
दरवर्षी रजिस्टर्ड मॅरेजला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. विवाहयोग्य मुलांना धुमधडाक्यात लग्न करणे आवडत होते. मात्र मागील वर्षीपासून कोरोनामुळे अनेकांनी रजिस्टर्ड मॅरेजचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे विनावश्यक खर्चाला कात्री बसत आहे.
बॉक्स
मे कठीणच
एप्रिल आणि मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नाचे मुहूर्त असतात. पण, मंगल कार्यालयात केवळ २५ जणांची उपस्थिती आणि आरटी-पीसीआर तपासणी अनिवार्य केल्याने विवाह सोहळे पार पडणार की नाही, हे कठीणच आहे. त्यामुळे मंगल कार्यालयाच्या संचालकांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कोट
मंगल कार्यालय चालकांच्या प्रतिक्रिया
अनेकांनी लग्नसोहळे रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मे महिन्यातील बुकिंग बहुतांश रद्द झाली आहे. लग्नकार्यासाठी आता आरटीपीसीआर बंधनकारक केल्याने कुणीही मंगल कार्यालयात लग्न करण्यास तयार नाही.
-----
गतवर्षी परिस्थिती सुधारेल या आशेवर अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले. पण आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने अनेकांनी लग्नसोहळे रद्द केले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एप्रिल व मे या दोन महिन्यांवरच संपूर्ण वर्षभराचा डोलारा अवलंबून असतो.
----