अडीच तासातच बेपत्ता मुलाचा शोध

By Admin | Updated: September 17, 2014 23:41 IST2014-09-17T23:41:08+5:302014-09-17T23:41:08+5:30

सायंकाळी खेळता खेळता अचानक सात वर्षीय मुलगा बेपत्ता झाला. काही वेळातच कुटुंबियांना ही बाब लक्षात आली. रात्री ९ वाजता त्यांनी घाबलेल्या अवस्थेत पोलिसांकडे धाव घेतली.

Two-and-a-half-hours of missing son's search | अडीच तासातच बेपत्ता मुलाचा शोध

अडीच तासातच बेपत्ता मुलाचा शोध

चंद्रपूर : सायंकाळी खेळता खेळता अचानक सात वर्षीय मुलगा बेपत्ता झाला. काही वेळातच कुटुंबियांना ही बाब लक्षात आली. रात्री ९ वाजता त्यांनी घाबलेल्या अवस्थेत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत अवघ्या अडीच तासात बेपत्ता मुलाचा शोध घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.
येथील आनंद नगरातील कुंदन ठाकूर हा मुलगा घरासमोर आपल्या मित्रांसोबत खेळत होता. अचानक सायंकाळच्या सुमारास कुंदन तिथे नसल्याचे कुटुंबीयाच्या लक्षात आले. त्यांनी कुंदनच्या इतर मित्राचा शोध घेतला असता ते आपापल्या घरी असल्याची माहिती मिळाली. रात्री ९ वाजेपर्यंत कुंदन घरी पोहचला नाही. त्यामुळे कुटुंबीय चांगलेच घाबरले. कुंदनचे अपहरण तर झाले नाही ना, अशी शंका आल्याने त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाणे गाठले. शहर पोलिसांनाही ही घटना गंभीर वाटली. त्यामुळे शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सिरसकर यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तात्काळ विविध पथक तयार करून शहराच्या बाहेर नाकाबंदी केली. शहरातील कानाकोपरा पिंजून काढला. दरम्यान, रात्री ११.३० वाजताच्या सुमारास महाकाली कॉलरी परिसरात पोलीस उपनिरीक्षक नीता वैश्य यांच्या नेतृत्वात पोलिसांचे एक पथक गेले असता तिथे काही ट्रक उभे असलेले दिसले. ट्रकांची तपासणी केली असता एका ट्रकमध्ये एक मुलगा झोपून असलेला दिसला.
तोच कुंदन असल्याची ओळख पटताच त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. सध्या कुंदन घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याची पोलिसांनी चौकशी केली नाही. उद्या १८ सप्टेंबरला त्याची चौकशी करणार असल्याचे पोलीस सूत्राने सांगितले. चौकशीनंतरच तो ट्रकमध्ये कसा गेला, याचा निर्वाळा होणार आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Two-and-a-half-hours of missing son's search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.