झाडीपट्टी नाटकांमधील 50 कोटीची उलाढाल थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 05:00 IST2020-12-29T05:00:00+5:302020-12-29T05:00:12+5:30
कोरोनामुळे नाटकांच्या प्रयोगांवर अनेक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाटकांवर एकप्रकारे बंदीच आहे. यामुळे कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यासमोरही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाटक हा कलाप्रकार झाटीपट्टीचा अविभाज्य घटक झाला आहे.

झाडीपट्टी नाटकांमधील 50 कोटीची उलाढाल थांबली
रवी जवळे / घनश्याम नवघडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवर अनेक कुटुंब निर्भर आहेत. हिवाळ्यातील चार-पाच महिने ही रंगभूमी लोकांचे करमणूक करीत असते. कलागुणांची मुक्त उधळण करणाऱ्या या रंगभूमी आणि त्यातील कलावंतांसाठी २०२० हे वर्ष ह्यकाळे वर्षह्ण ठरले. कोरोना संसर्गामुळे या रंगभूमी व त्यातील नाटकांच्या सादरीकरणावर अनेक मर्यादा आल्या. त्यामुळे नाटके सादर होऊ शकली नाही. या माध्यमातून होणारी ५० कोटींची उलाढाल यंदा थांबली.
कोरोनामुळे नाटकांच्या प्रयोगांवर अनेक मर्यादा घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाटकांवर एकप्रकारे बंदीच आहे. यामुळे कलावंत आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यासमोरही रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाटक हा कलाप्रकार झाटीपट्टीचा अविभाज्य घटक झाला आहे. ह्णज्या गावात नाटक नाही, असा गाव झाडीत नाहीह्ण ही म्हण गेल्या काही वर्षात झाडीपट्टीत चांगलीच रूढ झाली आहे. नाटकाचा हा सिझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो. या कालावधीत झाडीपट्टीत समावेश असलेल्या चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील प्रत्येक गावात नाटकांचे आयोजन होत असते. काही काही गावात तर दोन दोन नाटकांचे आयोजन होत असते. आता तर नागपूर व वर्धा जिल्ह्यातही नाटकांचे आयोजन सुरू झाले असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर झाडीपट्टी रंगभूमीने आंध्र प्रदेश व छत्तीसगड राज्यातही आपले अस्तित्व दाखवण्यास सुरूवात केली आहे.
दिवसेंदिवस झाडीपट्टी रंगभूमी आणखी प्रभावी ठरत आहे. चित्रपटगृहांना मिळणार नाही, एवढे प्रेक्षक झाडीपट्टीतील नाटकांना गर्दी करतात. दरवर्षी जवळपास ५० कोटींची उलाढाल या नाटकांमधून होते. मात्र २०२० हे वर्ष या रंगभूमीसाठी एक दु:खद स्वप्न ठरले.
कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे शासनाने नाटकांच्या सादरीकरणावर अनेक नियम घालून दिले आहेत. नियमांची पूर्तता करून नाटक सादर करणे शक्य नाही आणि आयोजनकर्त्यांना परवडण्यासारखे नाही. म्हणूनच संपूर्ण झाडीपट्टी रंगभूमी ओस पडली.
झाडीपट्टीवर हे घटक अवलंबून
झाडीपट्टी रंगभूमीवर विविध भूमिका निभावणाऱ्या निर्माते, कलावंत, वेशभुषाकार, ध्वनी व प्रकाश संयोजक, हार्मोनियम, तबला, क्लाट वादक व इतर संबंधित अनेकांना अर्थप्राप्ती होते, हे सर्वश्रूत आहे. या व्यतिरिक्त अनेक घटक या नाटकांवर अवलंबून आहेत. या घटकांमध्ये नाटक पहायला येणाºया प्रेक्षकांना चणे, फुटाणे, मुरमुरे, शेंगदाणे, चहा, पान विकून आपली उपजिविका चालविणाºया अनेक छोट्या व्यावसायिकांचाही समावेश आहे. आता तर नाटक सुरू होण्यापूर्वी नृत्याच्या आयोजनाचे कार्यक्रम होऊ लागले आहेत. या नृत्य संचामध्येही १० ते १२ कलाकारांचा समावेश असतो. २०२० या वर्षात नाटकांचे आयोजच झाले नसल्याने या कलाकारांसमोरही बिकट परिस्थिती उदभवली आहे.