अड्याळ टेकडी येथे तुकाराम बीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:16+5:302021-04-03T04:24:16+5:30

ब्रम्हपुरी : मंगळवारी तुकाराम बीजनिमित्त भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे दरवर्षीप्रमाणे तुकाराम बीज कार्यक्रम घेण्यात आला आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शक ...

Tukaram seed at Adyal hill | अड्याळ टेकडी येथे तुकाराम बीज

अड्याळ टेकडी येथे तुकाराम बीज

ब्रम्हपुरी : मंगळवारी तुकाराम बीजनिमित्त भू वैकुंठ अड्याळ टेकडी येथे दरवर्षीप्रमाणे तुकाराम बीज कार्यक्रम घेण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक सुबोधदादा भू-वैकुंठ अड्याळ टेकडी यांच्या उपस्थितीत, तर देविदास जगनाडे व ऋषिजी राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत जगद्गुरू तुकाराम महाराज पुण्यस्मरण सत्संग कार्यक्रम पार पडला.

संत तुकाराम महाराज यांची शिकवण, साहित्य, अध्यात्म, सामाजिक व राजकीय उत्थान आदी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि भू-वैकुंठ अड्याळ टेकडीच्या सर्व अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही तन, मन, धनाने सतत सहकार्य करून आपली भक्ती अधिक पुष्ट करण्याचा सर्वांनी संकल्प केला. अनेकांनी या कार्यासाठी तेव्हाच आर्थिक संकल्पसुद्धा देऊ केले. कार्यक्रमानंतर फाल्गुन राऊत परिवाराकडून सर्वाना सहभोजन देण्यात आले.

Web Title: Tukaram seed at Adyal hill