A truck transporting coal crashed under a bridge in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा वाहतूक करणारा ट्रक पुलाखाली कोसळला

चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा वाहतूक करणारा ट्रक पुलाखाली कोसळला

ठळक मुद्देट्रकचा टायर फुटल्याने झाला अपघातसुदैवाने चालक बचावला

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: कोळसा खाणीतून गोवरी सीएचपी मध्ये कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने अचानक ट्रक पुलाखाली कोसळला. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
राजुरा तालुक्यातील पोवनी ०२ कोळसा खाणीतून कोळसा वाहतूक करणा?्या एम. एच.३४ एव्ही_२५७४ या ट्रकचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक पुलाखाली कोसळला. सुदैवाने ट्रकचालक किशोर नत्थुजी कुळमेथे (३१) रा. चिचबोडी ता. राजुरा या अपघातात बचावला.

Web Title: A truck transporting coal crashed under a bridge in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.