वसतिगृहाअभावी आदिवासी मुली शिक्षणापासून वंचित
By Admin | Updated: September 4, 2014 23:42 IST2014-09-04T23:42:54+5:302014-09-04T23:42:54+5:30
शहरात अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात आले. तालुक्यातील ७५ मुलींच्या क्षमतेचे हे एकमेव वसतिगृह असून या वसतिगृहामध्ये पाचवी ते उच्च शिक्षण पदवी पर्यंतच्या ग्रामीण भागातील

वसतिगृहाअभावी आदिवासी मुली शिक्षणापासून वंचित
राजुरा : शहरात अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात आले. तालुक्यातील ७५ मुलींच्या क्षमतेचे हे एकमेव वसतिगृह असून या वसतिगृहामध्ये पाचवी ते उच्च शिक्षण पदवी पर्यंतच्या ग्रामीण भागातील मुली शिक्षण घेतात. परंतु, वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नसल्यामुळे अनुसूचित जमातीच्या मुलींना शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
कोरपना तालुक्यातील मांडवा येथील एका आदिवासी समाजाच्या मुलीला राजुरा येथील वसतिगृहात प्रवेश मिळाला होता. त्यामुळे त्या मुलीने महाविद्यालयाचा गणवेश घेऊन प्रवेश शुल्क भरले. काही दिवस वसतिगृहात राहील्यानंतर वसतिगृहाच्या वार्डनने जागा रिक्त नसल्याचे कारण सांगत त्या मुलीला हाकलून दिले. यासारख्या तालुक्यात अनेक मुली आहे. जे शाळा महाविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळाल्यामुळे शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
रागिनी तलांडे, पूजा शेडमाके, स्मिता सोयाम अशा अनेक मुलींना प्रवेश न मिळाल्याने भविष्य अंधकारमय आहे. शासन आदिवासींना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे. मात्र या योजना केवळ कागदावर आहेत. आदिवासी मुलींची शिकण्याची इच्छा असूनही त्यांच्यावर शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी आहे.
लोकप्रतिनिी मात्र, केवळ मत मागण्यासाठी दारात येतात. त्यानंतर त्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मुलींच्या पालकांनी केला आहे. शासनाने प्रवेशासाठी एटीकेटीची व्यवस्था केली आहे. मात्र, वसतिगृहात एटीकेटीच्या मुलीसाठी जागाच नाही.
अनेक वसतिगृहातील अधीक्षक मुख्यालयी राहत नाही. चपराशाच्या भरवश्यावर आदिवासी मुली शिक्षण घेत आहेत. मात्र, याचे कोणलाही सोयरसुतक नसल्याने त्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. मुलींना वसतिगूहात प्रवेश देण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)