आदिवासी मुलाचे वसतिगृह समस्यांच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:54 IST2019-02-27T22:54:30+5:302019-02-27T22:54:46+5:30

तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील मुलाच्या वसतिगृहात अनेक सुविधांची उणीव आहे. विविध समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

The Tribal Boy's Hostel Problems | आदिवासी मुलाचे वसतिगृह समस्यांच्या विळख्यात

आदिवासी मुलाचे वसतिगृह समस्यांच्या विळख्यात

ठळक मुद्देमुलभूत सुविधांचा अभाव : देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष

जयंत जेनेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील मुलाच्या वसतिगृहात अनेक सुविधांची उणीव आहे. विविध समस्यांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे. याकडे मात्र संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
या वसतिगृहातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असून ते वसतिगृहात राहून विद्यार्जन करतात. मात्र या वसतिगृहातील अनेक विद्युत दिवे बंद अवस्थेत, पंखे नादुरस्त असल्याने वास्तव्य करताना अडचणी येत आहे. तसेच येथील कुपनलिकेला पाणी कमी आहे. शिवाय अस्वच्छ पाणी येत आहे. तेच पाणी विद्यार्थ्यांना प्यावे लागत आहे. येथील वॉटर कुलर बंद असल्याने गरम पाणी प्यावे लागत आहे. पुढे उन्हाळ्याचे दिवस असल्याने येथील पाण्याची समस्या लक्षात घेता एका नवीन कूपनलिकेची गरज आहे. मात्र ही सुविधा करण्याकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची अडचण कायम आहे. अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय असलेले गिझरही बंद पडले आहे. वसतिगृहातील इमारतीचे दरवाजे, खिडक्या, खाटा तुटल्या आहे. शौचालय, बाथरूममधील शिटस व दरवाजे मोडकळीस आले असून मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. हीच परिस्थिती लगतच्या परिसराची आहे. त्यामुळे हिंस्र प्राण्यांचाहीं वावर वाढला आहे. त्यामुळे परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था होणे गरजेचे आहे. वसतिगृह इमारतीवरील पाण्याची टाकी अनेक दिवसांपासून स्वच्छ करण्यात आली नसल्याने त्यात गाळ साचला आहे. तेच पाणी विद्यार्थ्यांना वापरावे लागत आहे.
याबाबत अनेकदा वसतिगृह व्यवस्थापनाकडे तक्रारी करण्यात आल्या. मात्र या समस्या आजगायत सूटू न शकल्याने विद्यार्थ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
उदरनिर्वाह भत्ता केवळ ६०० रुपये.
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून महिन्याकाठी केवळ सहाशे रुपये उदरनिर्वाह भत्ता दिला जात असल्याने महागाईच्या काळात विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे कठीण होऊन बसले आहे. या सहाशे रुपयात महिनाभराचा मेसचा व इतर खर्च करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना अनेकदा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यांचा हा उदरनिर्वाह भत्ता वाढत्या महागाईनुसार वाढवण्याची मागणी विद्यार्थ्याकडून होत आहे.

Web Title: The Tribal Boy's Hostel Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.